Hit and Run : पारनेर तालुक्यातील पळवे शिवारात हिट अँड रन; एकाचा मृत्यू तर एक जखमी

Hit and Run : पारनेर तालुक्यातील पळवे शिवारात हिट अँड रन; एकाचा मृत्यू तर एक जखमी

0
Hit and Run : पारनेर तालुक्यातील पळवे शिवारात हिट अँड रन; एकाचा मृत्यू तर एक जखमी
Hit and Run : पारनेर तालुक्यातील पळवे शिवारात हिट अँड रन; एकाचा मृत्यू तर एक जखमी

Hit and Run : नगर : दारूच्या नशेत असलेल्या -कारचालकाने कार भरधाव वेगात चालवत एका मोपेडला जोराची धडक (Hit and Run) दिली. या अपघातात (Accident) मोपेडवरील ठकाजी रखमाजी तरटे (वय ८०, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) यांचा जागीच मृत्यू झाला (Death on the spot) तर मोपेड चालक गंभीर जखमी झाला आहे. पारनेर तालुक्यातील पळवे गावच्या शिवारात रविवारी (ता. २१) सायंकाळी हा भीषण अपघात झाला.

अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कार चालकाविरोधात गुन्हा दाखल (Hit and Run)

याबाबत मयताचे नातू रविराज रावसाहेब तरटे (वय २४, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे आजोबा ठकाजी रखमाजी तरटे हे पळवे येथून पळवे फाट्याकडे जात होते. त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका मोपेडला हात केला व ते मोपेड वर पाठीमागे बसले. त्यांची मोपेड शेलार वस्ती जवळ आली असता कारभारी भाऊसाहेब पोटघन (रा. जातेगाव, ता. पारनेर) याने कार ही दारूच्या नशेत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात चालवत मोपेडला जोराची धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेले ठकाजी तरटे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. या फिर्यादी वरून पोलिसांनी कारचालक कारभारी पोटघन याच्या विरुध्द मोटार वाहन कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा