SCAM : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

SCAM : अहिल्यानगरच्या 'एसबीआय'च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

0
SCAM : अहिल्यानगरच्या 'एसबीआय'च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
SCAM : अहिल्यानगरच्या 'एसबीआय'च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

SCAM : नगर : अहिल्यानगरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) (एसबीआय) मुख्य शाखेत तब्बल ३ कोटी ७७ लाख १ हजार ६१९ रूपयांच्या अपहाराचा (SCAM) प्रकार उघडकीस आला आहे. बँकेतीलच सिनियर असोसिएटने आपल्या पदाचा गैरवापर करत ही आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आहे.

अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संशयास्पद व्यवहार आढळून आले

या प्रकरणी एसबीआय मुख्य शाखेच्या शाखा प्रमुख भूमिजा साकेत रावत (वय ४३, मुळ रा. देहराडून, उत्तराखंड, हल्ली रा. सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. वैभव सुभाष रत्नपारखी (वय ४२, रा. अनुगंगा निवास, गणेशनगर, नागापूर), राहुल प्रकाश शिंदे व श्वेता प्रकाश शिंदे उर्फ श्वेता वैभव रत्नपारखी (दोघे रा. दत्तनगर, एकविरा चौक, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. भूमिजा रावत या २८ एप्रिल २०२५ पासून अहिल्यानगरच्या मुख्य शाखेत शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना एसबीआयकडे असलेल्या असामान्य आर्थिक व्यवहार तपासणी सॉफ्टवेअरमध्ये मे २०२५ मध्ये संशयास्पद व्यवहार आढळून आले. तपासादरम्यान वैभव सुभाष रत्नपारखी हा कर्मचारी या व्यवहारांशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले. तो सन २००९ ते २०१८ आणि पुन्हा १ जून २०२१ ते १३ मे २०२५ या कालावधीत मुदतठेव व गुंतवणूक विभागात सिनियर असोसिएट म्हणून कार्यरत होता. या विभागात ग्राहकांच्या मुदतठेवी स्वीकारणे, गुंतवणूक योजनांचे व्यवहार, मुदतपूर्ती झालेल्या ठेवी परत देणे व त्यांची संगणकीय नोंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यावर असते.

नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा

संगणकीय रेकॉर्डमध्ये केला फेरफार (SCAM)

वैभव रत्नपारखी याने ‘प्रबंधक’ या नावाने असलेल्या २२ मुदतठेव पावत्या, ‘जिल्हा ग्राहक मंच’ या नावाने असलेल्या ५३ मुदतठेव पावत्या बेकायदेशीरपणे बंद केल्या. त्या ठेवींमधील रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. राहुल शिंदे याच्या खात्याशी वैभव रत्नपारखी याचा मोबाईल नंबर लिंक असल्याचेही तपासात आढळले आहे. वैभव रत्नपारखी याने बनावट बँकर्स चेकचा वापर केला, तसेच खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली, संगणकीय रेकॉर्डमध्ये फेरफार केला, बँकर्स चेक बेकायदेशीररीत्या तयार केले, वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून व्यवहार मंजूर करून घेण्यासाठी इंटरनेट बँकिंग व यूपीआय सुविधेचा गैरवापर करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


वैभव रत्नपारखी याने सन २००९ ते २०१८ व २०२१ ते २०२५ या कालावधीत बँकेचा कर्मचारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून, नातेवाईकांशी संगनमत करून सरकारी बँकेच्या निधीचा ३ कोटी ७७ लाख रूपयांचा अपहार केल्याचा ठपका संशयित आरोपींवर ठेवण्यात आला आहे. आरोपींविरोधात फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, पुरावे नष्ट केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.