
Nashik–Pune Semi High-Speed Railway : अकोले: नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे (Nashik–Pune Semi High-Speed Railway) नाशिक – सिन्नर – संगमनेर – अकोले – नारायणगाव – राजगुरुनगर – चाकण या मार्गेच गेली पाहिजे. यासाठी जनआंदोलनाची (People’s movement) पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने सोमवारी (ता.२२) या मार्गात येणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक नांदूर खंदरमाळ फाटा येथे पार पडली.
अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे केले आश्वस्त
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भूमिका मांडणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वस्त केले आहे. चर्चेने प्रश्न सुटेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. मात्र तसे न झाल्यास चाकण किंवा आळेफाटा येथे बेमुदत रस्ते जाम करण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा
बैठकीत ऑनलाईन नेत्यांचा सहभाग (Nashik–Pune Semi High-Speed Railway)
आमदार सत्यजित तांबे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अजित नवले यांनी संवाद व आंदोलन या दोन्ही मार्गाने पुढे जाण्याची आवश्यकता व्यक्त केली. या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सदाशिव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, डॉ. किरण लहामटे, बाबाजी काळे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, नीलम अमोल खताळ, उत्कर्षा रूपवते, उदय सांगळे, कारभारी नवले, बाजीराव दराडे, कपिल पवार, दत्ता ढगे आदी उपस्थित होते.


