PM Narendra Modi : नगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पत्नी यशोदा बेन मोदी (Yashoda Ben Modi) यांनी सोमवारी (ता. २२) सायंकाळी बुऱ्हाणनगरच्या (Burhan Nagar) पुरातन तुळजाभवानी मंदिरास भेट देऊन तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच देवीची आरती केली.
अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
साडीचोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान
यावेळी मंदिराचे पुजारी भगत परिवाराच्या वतीने अॅड. विजय भगत व अॅड. अभिषेक भगत यांनी यशोदा बेन यांचे स्वागत केले. तसेच देवीचा प्रसाद व साडीचोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी यशोदा बेन यांचे नातेवाईकही त्यांच्या समवेत होते. तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने मोठे समाधान त्यांनी व्यक्त केले. यावेळी तुळजाभवानी देवी मंदिराचा पुरातन इतिहास भगत परिवारच्या वतीने यशोदा बेन यांना सांगण्यात आला. त्यांनी मोठ्या कुतूहलाने सर्व माहिती ऐकली. त्यामुळे भारावलेल्या यशोदा बेन यांनी मनोभावे देवीचे दर्शन घेत आरती केली.
नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात
यावेळी अभिषेक भगत म्हणाले, (PM Narendra Modi)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदा बेन मोदी यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेतल्याचे मोठे समाधान व आनंद भगत परिवाला झाला आहे. त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्यांचा शांत स्वभाव व साधे राहणीमानाने आम्ही प्रभावित झालो आहोत. यावेळी किरण भगत, कुणाल भगत, सुभाष भगत, राजेंद्र भगत, दुर्गा भगत, कविता भगत, अंकिता भगत, वैभवी भगत, सुनंदा भगत, वृषाली भगत, संकेत भगत, अजिंक्य भगत, रोहित भगत, अक्षता भगत व भगत परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच भाजपाचे ज्ञानेश्वर काळे, विजय काळे, भरत चौधरी व भीमराज महाले आदी उपस्थित होते.



