Shivsena UBT and MNS Yuti : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

Shivsena UBT and MNS Yuti : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

0
Shivsena UBT and MNS Yuti : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा
Shivsena UBT and MNS Yuti : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

Shivsena UBT and MNS Yuti : नगर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या ऐतिहासिक युतीची (Shivsena UBT and MNS Yuti) घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असंही राज ठाकरे म्हणाले. तर महाराष्ट्राच्या रक्षणसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितले. आज (24 डिसेंबर) मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली.

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी अखेर एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात बीएमसी निवडणूक साठी युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत युतीची औपचारिक घोषणा केली. यावेळी मंचावर उद्धव आणि राज यांच्यासह संजय राऊतही व्यासपीठावर होते.

Shivsena UBT and MNS Yuti : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा
Shivsena UBT and MNS Yuti : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

अवश्य वाचा: चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील

राज ठाकरेंनी युतीची केली घोषणा

“बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना व मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत”, असं ते म्हणाले. “मी एका मुलाखतीत म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही तुम्हाला नाही सांगणार. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत. त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत, त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे वगैरे माहिती नंतर दिली जाईल”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

Shivsena UBT and MNS Yuti : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा
Shivsena UBT and MNS Yuti : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

नक्की वाचा : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार

“उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत” (Shivsena UBT and MNS Yuti)

दरम्यान, यावेळी भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी “ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल”, अशी टीका केल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी खुमासदार उत्तरे दिली. “ते स्वत: उत्तरं देण्याच्या पात्रतेचे राहिले आहेत का?” असा प्रश्नच उद्धव ठाकरेंनी विचारला. तर राज ठाकरेंनी “उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाही”, असं म्हणत टोला लगावला!