Asha Firodia : नगर : आजचे विद्यार्थी (Students) हे उद्याच्या देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे विद्यार्थी दशेत नेहमी प्रामाणिक राहावे, शिस्त पाळावी. पालकांचा तसेच शिक्षकांचा आदर करावा ते आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करता. त्यांनी घडविलेले मुले कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनियर तर कोणी शिक्षक होणार आहेत. अपयश आले तर विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, प्रयत्न करत राहावे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Function) हे आयोजित केले जाते. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मन भारावून गेले असल्याचे प्रतिपादन आशाताई फिरोदिया (Asha Firodia) यांनी केले आहे.

अवश्य वाचा: चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील
विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित
शहरातील पाईपलाईन रस्ता व तपोवन रस्ता परिसरात असलेल्या आशा एज्युकेशन फाउंडेशन संचालित जय बजरंग प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आज (ता. २४) मोठ्या उत्साहात झाला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उद्योजक तथा अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष राखी फिरोदिया, रेखाताई सारडा, सहसचिव उमेश गांधी, व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा, जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य संगीता पाठक, मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, तपोवन माध्यमिक विद्यालय वर्षा कुसकर आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार
यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, (Asha Firodia)
नुकत्याच झालेल्या शालेय विविध स्पर्धेत जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थांनी यश मिळविले आहे. त्यांच्या यशामागे शिक्षक, पालक यांनी खूप कष्ट घेतले आहे. त्यांना ही खूप शुभेच्छा देतो. शिक्षणाबरोबर खेळालाही तितकेच महत्व आहे. आशा फाउंडेशनच्या वतीने लागेल तितकी मदत केली जाणार आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आपला मानस आहे. तपोवन परिसरात एक नवीन वास्तू उभी केली आहे. त्या शाळेचे नामकरण रेखा बालकिसन सारडा विद्यालय हे करणार आहोत. ज्या मुलांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून आज आपण स्नेहसंमेलन करत असतो. तसेच २५ वर्षे संस्थेला पूर्ण होत आहेत. एका चांगले प्लॅनिंग करून माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करू, असे ही आश्वासन त्यांनी दिले.




