Sangram Jagtap : नगर : नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Election) विजयाने राज्यात महायुतीने (Mahayuti) नवा इतिहास घडवला आहे. या विजयाची पुनरावृत्ती अहिल्यानगर महापालिकेतही आता १६ जानेवारीला होणार आहे. शहराच्या विकासाचा वेग वाढण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी या निवडणुकीत (Election) पुन्हा महायुतीच्याच मागे उभे राहावे. जे सरकार देशात व राज्यात आहे त्याच विचाराच्या महायुतीची सत्ता महापालिकेत येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
अवश्य वाचा: चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील
किशोर डागवले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवले व आशा डागवले यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. २४) झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जगताप यांनी राष्ट्रवादीचा पंचा घालून डागवाले दाम्पत्याचे स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी अध्यक्ष प्रा.माणिक विधाते, माजी नगरसेवक दत्ता मुद्गल, ज्येष्ठ नागरिक भोसले, नितीन डागवाले, रोहन डागवाले, रोहित डागवाले, विकास वाघ, संग्राम रासकर, दीपक खेडकर यांच्यासह मोठ्या संख्यने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नक्की वाचा : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार
आ.संग्राम जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)
महापालिकेत आता नवे कारभारी येणार आहे. या नव्यांना जुन्या अनुभवी माणसांची खूप गरज आहे. त्यामुळे महापालिकेत डागवाले यांच्या अनुभवाच्या शिदोरीची गरज असणार आहे. या भागातील पावसाच्या पाण्याचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी किशोर डागवाले यांनी सतत पाठपुरावा केल्याने आता कितीही अतिवृष्टी झाली तरी पटवर्धन चौकात पाणी साचत नाही. नगरसेवक नसतानाही त्यांनी या भागाचे प्रलंबित प्रश्न सोडवले आहेत. शहराच्या पुढील २५ वर्षांच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन केले आहे. त्या दृष्टीने गेल्या दोनतीन वर्षात शहराच्या विकासाचा वेग वाढला आहे. हा वेग असाच पुढे जाण्यासाठी सर्वांच्या मतरुपी आशीर्वादाची गरज आहे.
गणेश भोसले म्हणाले, माझी व किशोर डागवाले यांची ३० वर्षापासूनची जुनी मैत्री. पण गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षात होतो. आता आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आम्ही पुन्हा एकत्रो आल्याचे समाधान व्यक्त करून त्यांना महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.किशोर डागवाले म्हणाले, पदावर असो किंवा नसो गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या भागाच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना आ. जगताप यांनी साथ व भरीव निधी देत या भागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या भुयारी गटारीचा व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावले आहेत. यावेळी संपत बारस्कर म्हणाले, आ. जगताप यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकासकामांची माहिती दिली. प्रास्ताविक अरविंद शिंदे यांनी केले. शिववरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गोरे यांनी आभार मानले. यावेळी आरती आढावा, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब वैद्य, रऊफ खान, मंदार पळसकर, अॅड.सुनील सूर्यवंशी, सचिन भिंगारकर, शिल्पा गणगले, उज्वला भंगे, प्रांजली डागवाले, सोना डागवाले, अनुजा डागवाले, रुपाली गणगले¸भावना शिंगवी यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.



