Accident : सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे यांचे अपघाती निधन

Accident : सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे यांचे अपघाती निधन

0
Accident : सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे यांचे अपघाती निधन
Accident : सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे यांचे अपघाती निधन

Accident : नगर : अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत (Local Crime Branch) कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वसंत गांगर्डे (वय ५४, रा. कोंभळी, ता, कर्जत) यांचे आज (ता. २४) सकाळी पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे. त्यांचा २० डिसेंबर रोजी रात्री अपघात (Accident) झाला होता. यात ते गंभीर जखमी (Seriously Injured) झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते.

अवश्य वाचा: चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील

खर्डा गावाजवळ अपघातात

गांगर्डे हे पत्नी, मुलगा व मुलगी यांच्या समवेत त्यांच्या कारने जेजुरी, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतत असताना २० डिसेंबर रोजी मध्यरात्री जामखेड तालुक्यातील खर्डा गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात त्यांना व त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. तर मुलांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्या दोघांना प्रथम नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रमेश गांगर्डे यांच्या तोंडाला आणि डोक्याला जास्त मार लागलेला असल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी त्यांची मूळ गाव कोंभळी, ता. कर्जत येथे दुपारी करण्यात आला.

नक्की वाचा : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार

विविध विभागात कामगीरी (Accident)

रमेश गांगर्डे यांनी जिल्हा पोलीस दलात कोतवाली, पारनेर, नगर तालुका, तोफखाना या ठिकाणी काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत नव्याने नेमणुका करताना त्यांची निवड केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, वडील, २ भाऊ असा परिवार असून, त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.