
Extortion : नगर : सुपा एमआयडीसीत (Supa MIDC) सुरु असलेले फायर फायटर सिस्टीमचे काम बंद करून ५ लाखांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. काम सुरु केल्यास कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिली आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) रोजी घडली असून याबाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील
कामगारांना शिवीगाळ करून धमकी
अंजली दत्तात्रय येवले (रा. वडझिरे, ता. पारनेर, हल्ली रा. मोशी, पुणे) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुपा एमआयडीसी परिसरात पळवे बुद्रुक शिवार, (ता. पारनेर) येथे असलेल्या एका कंपनीत फायर फायटर सिस्टीमचे काम करत असताना संशयित राजू पाचारणे (रा. पळवे खुर्द) हा तेथे आला व त्याने कामगारांना शिवीगाळ करून धमकी देऊन म्हटले की, कंपनीत काम चालू करायचे असेल तर माझी परवानगी घ्यायची. जर काम चालू केले तर तुमचे कुऱ्हाडीने हातपाय तोडून सर्वांना जिवे ठार मारू, अशी धमकी दिली.
नक्की वाचा : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार
काम करायचे तर 5 लाखांची खंडणी द्यावी लागेल (Extortion)
त्यानंतर फिर्यादी व तेथील कामगार यांनी त्यास समजावून सांगत असताना तो फिर्यादीस म्हणाला की, तुला काम करायचे असेल तर मला पाच लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, तरच तुझे काम चालू कर; नाहीतर काम बंद ठेव, असे म्हणून त्याने कंपनीतील चाललेले काम बंद पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुटे करत आहेत.


