Fight between two groups : दोन गटांत तुंबळ हाणामारी, चौघे जखमी; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Fight between two groups : दोन गटांत तुंबळ हाणामारी, चौघे जखमी; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Fight between two groups : दोन गटांत तुंबळ हाणामारी, चौघे जखमी; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Fight between two groups : दोन गटांत तुंबळ हाणामारी, चौघे जखमी; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Fight between two groups : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा (Ralegan Mhasoba) शिवारात दोन गटात हाणामारी (Fight between two groups) झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन्ही गटांचे चार जण जखमी (Injured) झाले असून, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) परस्पर विरोधी फिर्यादींवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

काठी, लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण

राजाराम विठोबा कारंडे (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत कारभारी कारंडे, सचिन हनुमंत कारंडे, सार्थक हनुमंत कारंडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.२३) सकाळी संशयित आरोपींनी लाकडी काठी, लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

फिर्यादी व त्यांचा मुलगा जखमी (Fight between two groups)

या मारहाणीत फिर्यादी राजाराम कारंडे व अनिल राजाराम कारंडे हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेतील दुसऱ्या बाजूने हनुमंत कारभारी कारंडे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजाराम विठोबा कारंडे, अनिल राजाराम कारंडे, सिताबाई राजाराम कारंडे, गिता अनिल कारंडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर शिवीगाळ करून, लोखंडी शिवळ व लाकडी काठीने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांचा मुलगा जखमी झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.