नगर : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे (Akshay Kumar) नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अक्षय बऱ्याच काळापासून ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) या चित्रपटावर काम करत होता. आता या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ख्रिसमसच्या दिवशी अक्षय कुमारने पोस्ट करून ‘वेलकम टू द जंगल’च्या टीमसोबत स्वत:ची एक झलक दाखवली. या चित्रपटात अक्षय कुमारपासून सुनील शेट्टीपर्यंत तगडी स्टारकास्ट आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज (Teaser Release) झाला आहे.
नक्की वाचा: शुभमन गिलला संधी न देण्याचं कारण काय? अजित आगरकरांनी एका वाक्यात विषय संपवला
अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडिओत काय ? (Welcome To The Jungle Teaser)
अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटात अक्षयची दुहेरी भूमिका असल्याची माहिती आहे. एका भूमिकेत त्याचे केस पूर्णपणे पांढरे आहेत. तो या भूमिकेत वयस्कर दिसत आहे. तर, दुसऱ्या भूमिकेत अक्षय तरूण आणि फिट दिसत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अक्षय कुमारसह संपूर्ण स्टारकास्ट लष्कराच्या गणवेशात दिसत आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टिझरवर प्रेक्षकांनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अवश्य वाचा: राज्यात थंडीचा कडाका वाढला;अहिल्यानगरमध्ये पारा ६ अंशावर
प्रदर्शित झालेल्या व्हिडिओमध्ये, वेलकमच्या थीम सोबत जिंगल बेल्स वाजताना ऐकू येत आहे. संपूर्ण कलाकार लष्कराच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. तसेच कलाकार चालताना दिसत आहेत. या चित्रपटात नेमके किती कलाकार आहेत, हे या व्हिडिओतून दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘वेलकम टू द जंगलच्या संपूर्ण टीमच्या वतीने, तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार. मी कधीही इतक्या मोठ्या टीमचा भाग नव्हतो. आमच्यापैकी कोणीही नव्हते. आम्ही या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना गिफ्ट देण्यास उत्सुक आहोत. चित्रपटाचे काम पूर्ण झाले आहे मित्रांनो!’.
चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार (Welcome To The Jungle Teaser)
या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, अर्शद वारसी, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, तुषार कपूर, पुनीत इस्सर आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



