
नगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआय (PSI) पदासाठी भरती जाहीर (PSI recruitment announced) करण्यात आली आहे. मात्र, या भरतीला विलंब झाल्याने काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यासंदर्भात, संबंधित विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, असं शरद पवार (Sharad pawar) यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: विवाहितेवर अत्याचार करत चिमुकल्याची हत्या करणाऱ्या नराधमाला अखेर फाशी;७ वर्षांनी मिळाला न्याय
काय म्हणाले शरद पवार ? (Sharad Pawar For MPSC Students)

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने ‘संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी मागील ५ ते ६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे समस्या मांडल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमख शरद पवार यांनी दिली.
अवश्य वाचा: ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर रिलीज; अक्षय कुमारचा डबल रोल
प्रकरण नेमकं काय ? (Sharad Pawar For MPSC Students)
शासनाने पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे ? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी विद्यार्थी, उमेदवारांकडून केली जात आहे.
विशेष म्हणजे पीएसआय पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केली आहे. या मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, असे शरद पवार यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन केली आहे.


