Local Crime Branch : विराज कॉलनीतील व्यापाऱ्याच्या घरी चोरी करणारा गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Local Crime Branch : विराज कॉलनीतील व्यापाऱ्याच्या घरी चोरी करणारा गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

0

Local Crime Branch : नगर : तोफखाना पोलीस ठाणे (Tofkhana Police Station) हद्दीत असलेल्या विराज कॉलनीतील व्यापाऱ्याच्या घरी चोरी (Theft) करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने गजाआड केला आहे. त्याने व्यापाऱ्याचे बंद घर फोडून सुमारे १४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. 

नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

आरोपीच्या साथीदारांचा शोध सुरू

रफिक मेहबूब शेख असे ताब्यात घेतलेला संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार विराज कॉलनीत अशोककुमार अग्रवाल यांच्या घरी चोरी ही रफिक शेख याने केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार त्याचा शोध घेतला असता तो राबोडी जी. ठाणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल (Local Crime Branch)

ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कराड, जि. सातारा, राबोडी, जि. ठाणे,  विश्रामबाग, जि. ठाणे), पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, रोहित येमुल, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांच्या पथकाने केली.