Illegal Liquor : पारनेरमध्ये गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; पोलीस उपअधीक्षक वमने यांची कारवाई

Illegal Liquor : पारनेरमध्ये गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; पोलीस उपअधीक्षक वमने यांची कारवाई

0
Illegal Liquor : पारनेरमध्ये गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; पोलीस उपअधीक्षक वमने यांची कारवाई
Illegal Liquor : पारनेरमध्ये गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; पोलीस उपअधीक्षक वमने यांची कारवाई

Illegal Liquor : नगर : पारनेर (Parner) तालुक्यातील निघोज परिसरात सुरु असलेली अवैध गावठी दारूची (Illegal Liquor) भट्टी ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने उद्ध्वस्त केली आहे. या कारवाई दारू बनविण्याचे ३७ हजार ७०० लिटर दारुचे कच्चे रसायन (Raw chemical for liquor) व साहीत्य असा एकुण १८ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

१८ लाख ६६ हजार ५०० रुपय मुद्देमाल नष्ट

आदिनाथ मच्छिंद्र पठारे (रा. पठारवाडी, निघोज ता. पारनेर जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अहिल्यानगरचे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांना मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील निघोज येथील पठारवाडी परिसरात कुकडी कॅनॉल लागत गावठी हातभतभट्टी सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पारनेर पोलीस व ग्रामीण विभाग पथकाने सापळा रचून छापा टाकत हातभट्टी उद्ध्वस्त केली. १४ हजारांची १४० लिटर तयार दारू व दारू बनविण्याचे ३७ हजार ७०० लिटर दारूचे कच्चे रसायन व साहित्य असा एकूण १८ लाख ६६ हजार ५०० रुपय मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात पोलीस अमलदार नितीन खंडागळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

यांच्या पथकाने केली कारवाई (Illegal Liquor)

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पारनेरचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहायक फौजदार एस. एन कडूस, गणेश डहाळे, पोलीस अंमलदार गणेश धुमाळ, रणजीत जाधव, अजिंक्य साठे, प्रकाश बोबडे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली.