Consumer Rights : दर्जेदार सुविधा मिळणे हा ग्राहकांचा हक्क : तहसीलदार आकाश दहाडदे

Consumer Rights : दर्जेदार सुविधा मिळणे हा ग्राहकांचा हक्क : तहसीलदार आकाश दहाडदे

0
Consumer Rights : दर्जेदार सुविधा मिळणे हा ग्राहकांचा हक्क : तहसीलदार आकाश दहाडदे
Consumer Rights : दर्जेदार सुविधा मिळणे हा ग्राहकांचा हक्क : तहसीलदार आकाश दहाडदे

Consumer Rights : शेवगाव : ग्राहकांना (Consumer) दर्जेदार सुविधा मिळणे तसेच खरेदी करताना वस्तूंची गुणवत्ता तपासून घेणे हा ग्राहकांचा मूलभूत हक्क (Consumer Rights) असून, प्रत्येक ग्राहकाने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन शेवगावचे तहसीलदार (Tehsildar) आकाश दहाडदे यांनी केले.

नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

शेवगाव तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार आकाश दहाडदे हे होते.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, शेवगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामदास आगळे, ॲड. सुभाष लांडे, तालुका पुरवठा अधिकारी दिपाली हवाले, पुरवठा निरीक्षक निलेश वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संकल्प लोणकर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात तहसीलदार दहाडदे म्हणाले की, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या विषयांवर दरमहा बैठक घेऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

एक्सपायरी तारीख तपासणे अत्यंत आवश्यक (Consumer Rights)

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते; मात्र तक्रार कुठे करावी, याची माहिती नसते. ग्राहक पंचायतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून, याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे. ॲड. सुभाष लांडे यांनी ग्राहकांनी खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूचे बिल घेणे, त्यावरील उत्पादन तारीख व एक्सपायरी तारीख तपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करून याबाबत अधिक जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव शेवाळे यांनी ग्राहकांची फसवणूक झाल्यास कुठे व कशा पद्धतीने तक्रार करावी, याबाबत ई-जनजागृती पोर्टलची माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी वीज, ऊस, पाणीपुरवठा व रस्त्यांबाबत तक्रारी मांडल्या. या सर्व तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन तहसीलदार आकाश दहाडदे यांनी दिले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सावरकर, माजी प्राचार्य शिरीष कुलकर्णी, शिवदास सरोदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे राधेश्याम तिवारी, ओमप्रकाश धूत, परिवहन विभागाचे सोमनाथ देवढे, महावितरणचे विश्वास नरके, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब औटी, उपाध्यक्ष रघुनाथ सातपुते, रवींद्र शेळके, सतीश भोईटे, विजय काथवटे, ऋषिकेश शिंदे, मनीषा पुंड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रवासी आयाम प्रमुख ज्ञानेश्वर फसले यांनी केले. प्रास्ताविक सचिव संदीप गवळी यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन आप्पासाहेब औटी यांनी केले.