Traffic Diversion : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश

Traffic Diversion : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश

0
Traffic Diversion : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश
Traffic Diversion : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश

Traffic Diversion : नगर : पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाणे (Lonikand Police Station) हद्दीत पेरणे (ता. हवेली) येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या जयस्तंभ कार्यक्रमानिमित्त वाहतूक कोंडी व अडथळा होऊ नये, याकरिता अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाने अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील वाहतूक मार्गात (Traffic Diversion) ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे रात्री १२ ते २ जानेवारी २०२६ रोजीचे सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान सुमारे ३० तासांसाठी बदल केला आहे. या आदेशाचे पालन करून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी केले आहे.

नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

वाहतूक कोंडी होण्याची शक्यता

१ जानेवारी रोजी जयस्तंभ कार्यक्रम होणार असून यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे. हा कार्यक्रम अहिल्यानगर-पुणे महामार्गालगत असून कार्यक्रमाकरिता येणाऱ्या नागरीकांमुळे या महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून वाहनांचा कार्यक्रमाकरिता आलेल्या भाविकांना धक्का लागून, अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे रात्री १२ ते २ जानेवारी २०२६ रोजीचे सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अहिल्यानगर – पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक तसेच अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्याचे नियोजित केले आहे.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग (Traffic Diversion)

बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी मार्ग बेलवंडी फाटा, देवदैठण, धावलगाव, पिंपरी कोळंडर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गे पुणेकडे. नगर कडून सरळ पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग कायनेटीक चौक /केडगाव बायपास, अरणगाव बायपास, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गे पुणे कडे. नगरकडून पुणे मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाणे कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग कल्याण बायपास, आळेफाटा, ओतूर, माळशेज, घाट मार्ग असा राहील. या आदेशाचे पालन करून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.