Vaibhav Suryavanshi:कमी वयात गाजवलं क्रिकेटचं मैदान;वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने गौरव

0
Vaibhav Suryavanshi:कमी वयात गाजवलं क्रिकेटचं मैदान;वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते 'राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने गौरव
Vaibhav Suryavanshi:कमी वयात गाजवलं क्रिकेटचं मैदान;वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते 'राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने गौरव

नगर : भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा सातत्याने आपल्या कामगिरीतून क्रिकेटविश्वात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. त्याच्या या यशाबद्दल आता त्याला भारत सरकारकडूनही सन्मानित करण्यात आले आहे. वैभव सूर्यवंशीला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने (Prime Minister’s National Children’s Award) गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नक्की वाचा:  भारताकडून K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;२ टन अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता    

वैभव सामन्याला मुकला (Vaibhav Suryavanshi)

आज २६ डिसेंबरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहार संघ आपला दुसरा सामना खेळत असताना, पुरस्कार समारंभामुळे वैभवला सामन्याला मुकावे लागले. विशेष म्हणजे, फक्त वैभवच नाही, तर या कार्यक्रमात शौर्य, क्रीडा, संगीत, विज्ञान आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील गुणवंत मुलांना सन्मानित करण्यात आले. बिहारच्या समस्तीपूर येथील वैभव सूर्यवंशीला क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

वैभवच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय ?  (Vaibhav Suryavanshi)

हा पुरस्कार वैभवसाठीच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण ठरला. वैभवचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशी याने सोशल मीडियावर वैभवचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिले, देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते वैभवला बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

अवश्य वाचा: ‘आपल्या घरावर बॉम्ब पडल्यावर आपली जी अवस्था तीच प्राण्यांच्या घरांची होते’- सयाजी शिंदे
वैभव आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू आहे. तसेच तो क्रिकेटमध्ये कमी चेंडूत शतक झळकावणारा खेळाडू आहे. या कामगिरीसाठी वैभवला हा पुरस्कार देण्यात आला आहे. वैभवचे नाव पुरस्कारासाठी घेतलं जात असताना विज्ञान भवनात टाळ्यांनी त्याचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी वैभव नारंगी रंगाचा ब्लेझर आणि पांढरा कुर्ता-पायजामा परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाला होता.

या पुरस्कारासाठी त्याने विजय हजार ट्रॉफीतून माघार घेतली आहे. त्यानंतर तो U-19 संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेला जाणार असल्याची माहिती आहे. हा संघ ४ ते ९ जानेवारी दरम्यान तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. ही मालिका १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या तयारीसाठी खेळली जात आहे. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीतून वैभवने माघार घेतली आहे.