Political : केडगावात राजकीय रणधुमाळी; कोतकर गटाच्या हालचालींना वेग

Political : केडगावात राजकीय रणधुमाळी; कोतकर गटाच्या हालचालींना वेग

0
Political : केडगावात राजकीय रणधुमाळी; कोतकर गटाच्या हालचालींना वेग
Political : केडगावात राजकीय रणधुमाळी; कोतकर गटाच्या हालचालींना वेग

Political : नगर : आगामी महापालिका निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Corporation Election) पार्श्‍वभूमीवर केडगाव परिसरातील राजकीय (Political) हालचालींना वेग आला आहे. केडगावच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कोतकर गट पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महायुती होणार की नाही, उमेदवारीचे अंतिम गणित कसे असणार, याबाबत पक्षपातळीवर चर्चा सुरू असतानाच कोतकर (Bhanudas Kotkar) गटाने कोणतीही प्रतीक्षा न करता आपले उमेदवार निश्‍चित करून प्रचाराचा धुराळा उडवला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

संपूर्ण परिसरात निवडणुकीची चाहूल

प्रभाग क्रमांक १७ मधील भरत सुभाष कांबळे, महेश पोपटराव सरोदे आणि प्रतिभा ज्ञानेश्‍वर कोतकर या उमेदवारांच्या प्रचाराचा ‘नारळ फोडून’ प्रचार सुरु करण्यात आला. देवी रोड परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीने संपूर्ण परिसरात निवडणुकीची चाहूल लागल्याचे चित्र दिसून आले. यावेळी केडगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचार रॅली काढण्यात आली.

अवश्य वाचा : भारताकडून K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;२ टन अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता

विरोधी उमेदवार जाहीर हाेण्याआधीच प्रचाराला सुरूवात (Political)

केडगाव मध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधी गटाकडून नेमके कोण उमेदवार असणार, हे अद्याप स्पष्ट नसतानाही कोतकर गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या उमेदवारांचा प्रचार थेट मतदारांच्या दारात नेण्याची रणनीती आखत घरोघरी भेटीगाठी, वैयक्तिक संवाद आणि प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

या प्रचार रॅलीत कोतकर गटाचे समर्थक, केडगावमधील ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रचारात ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर स्वतः सक्रियपणे सहभागी होत मतदारांशी थेट संवाद साधत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, प्रचाराला अधिक गती आली आहे. कोतकर गटाने भाजपकडून उमेदवारी मागितली असली तरी ती मिळणार की नाही, याची औपचारिक घोषणा होण्याची वाट न पाहता थेट मैदानात उतरून प्रचार सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

समोरील स्पर्धक कोण असणार, कोणत्या पक्षाकडून उमेदवार उभे राहणार, हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच कोतकर गटाने घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केल्याने प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रचाराची रंगत वाढली आहे. सध्या तरी प्रचाराच्या मैदानात कोतकर गटाने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असून, येत्या काळात इतर गट व पक्षांची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण केडगावचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव हा राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.