Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल; आतापर्यंत १५०८ उमेदवारी अर्जांची विक्री

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल; आतापर्यंत १५०८ उमेदवारी अर्जांची विक्री

0
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल; आतापर्यंत १५०८ उमेदवारी अर्जांची विक्री
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल; आतापर्यंत १५०८ उमेदवारी अर्जांची विक्री

Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील (Ahilyanagar Municipal Corporation Election) उमेदवारी अर्ज विक्री व भरण्याची प्रक्रिया (Application Process) सुरू आहे. यात आतापर्यंत एक हजार ५०८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. त्यात ३४९ उमेदवारी अर्ज (Nomination Form) आज विकले गेले. आतापर्यंत १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात १४ उमेदवारी अर्ज आज दाखल झाले.

नक्की वाचा : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

सहा ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने सहा ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. यात सावेडीतील तहसील कार्यालय समोरील जागेत प्रभाग १ ते ३, महापालिकेच्या सावेडीतील प्रभाग समिती कार्यालयाजवळ प्रभाग ४ ते ८ प्रभागांसाठी, माळीवाडा येथील महापालिकेच्या जुन्या इमारत प्रांगणात ९ ते ११ प्रभागांसाठी, महापालिकेच्या भोसले आखाडा येथील प्रभाग समिती कार्यालय प्रांगणात १२ ते १७ प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येत आहेत.

अवश्य वाचा : भारताकडून K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;२ टन अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता

एआयएमआयएमच्या ४ उमेदवारांची यादी जाहीर (Ahilyanagar Municipal Corporation Election)

महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचे अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे महायुतीतील उमेदवार दोन पक्षांकडून अथवा एक पक्ष व दुसरा अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून आले. यातच एआयएमआयएमने प्रभाग क्रमांक चारसाठी चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शाहनाज खालीद शेख, सलमा जबीर शेख, शाहबाज अहमद सईद व समद वाहब खान यांची नावे जाहीर झाली आहेत. ते लवकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.

महायुतीतील पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे काही नेते थेट मुंबईत जाऊन आल्याचेही समजते. यात आमदार संग्राम जगताप यांचे होर्डिंग आज शहरात झळकले यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटोही आहेत. त्यामुळे महायुती होईल का? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर शहरात सध्या चर्चा रंगली आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे, प्रभाग व पक्ष

प्रभाग क्रमांक १ क – दीपाली बारस्कर – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

प्रभाग क्रमांक २ ब – महेश तवले – भाजप

प्रभाग क्रमांक २ ड – महेश तवले – भाजप

प्रभाग क्रमांक २ ड – महेश तवले – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

प्रभाग क्रमांक ३ अ – चंद्रकांत शेळके – शिवसेना शिंदे गट

प्रभाग क्रमांक ३ अ – चंद्रकांत शेळके – अपक्ष

प्रभाग क्रमांक ४ ब – प्रवीण गायकवाड – अपक्ष

प्रभाग क्रमांक ५ अ – काजल भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

प्रभाग क्रमांक ५ अ – काजल भोसले – अपक्ष

प्रभाग क्रमांक ५ ड – अविनाश साठे – अपक्ष

प्रभाग क्रमांक ७ अ – अनिता दळवी – अपक्ष

प्रभाग क्रमांक ७ ड – हनुमंत भुतकर – शिवसेना

प्रभाग क्रमांक १६ क – विजय पठारे – अपक्ष

प्रभाग क्रमांक १६ ड – ज्ञानेश्वर येवले – अपक्ष