Ahilyanagar Municipal Elections : केडगावात राजकीय रणधुमाळी; वैयक्तिक भेटीगाठीवर जोर

Ahilyanagar Municipal Elections : केडगावात राजकीय रणधुमाळी; वैयक्तिक भेटीगाठीवर जोर

0
Ahilyanagar Municipal Elections : केडगावात राजकीय रणधुमाळी; वैयक्तिक भेटीगाठीवर जोर
Ahilyanagar Municipal Elections : केडगावात राजकीय रणधुमाळी; वैयक्तिक भेटीगाठीवर जोर

Ahilyanagar Municipal Elections : नगर : आगामी महापालिका निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Elections) पार्श्‍वभूमीवर केडगाव (Kedgaon) परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. केडगावच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रभाग १६ मध्ये कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पूर्वी असणाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक (Election) हाती घेतली असून, कोणतीही प्रतीक्षा न करता सर्वसामान्य उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. 

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल

निवडणुकीला येणार रंगत

प्रभाग क्रमांक १६ मध्ये जयश्री टकले यांनी प्रचाराचा नारळ वाढवून जनसंपर्क सुरु केला आहे. प्रभाग १६ मधील असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी थेट सर्वसामान्य नागरिकांनीच ही निवडणूक हाती घेतली असल्याचे बोलले जात आहे. या प्रभागातील केडगाव गावठाण, भुषणनगर, हॉटेल रंगोली, शिवाजी नगर, वैष्णव नगर, एकनाथ नगर, राभाजी नगर, शाहू नगर, अंबिका नगर, खाटिक मळा, रेणुका नगर, टाटा मोटर्स, सुखसागर हॉटेल, झेंडा चौक अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

नक्की वाचा : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन

थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू (Ahilyanagar Municipal Elections)

विरोधी गटाकडून नेमके कोण उमेदवार असणार, हे अद्याप स्पष्ट नसतानाही टकले यांनी प्रचार थेट मतदारांच्या दारात नेण्याची रणनीती आखत घरोघरी भेटीगाठी, वैयक्तिक संवाद आणि प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू केले असून नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या प्रचार रॅलीत टकले गटाचे समर्थक, केडगावमधील ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. समोरील स्पर्धक कोण असणार, कोणत्या पक्षाकडून उमेदवार उभे राहणार, हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच जयश्री टकले यांनी घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केल्याने प्रभाग क्रमांक १६ मध्ये प्रचाराची रंगत वाढली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत थंडीत वातावरण तापले असल्याचे बोलले जात आहे.