MIDC Police Station : निंबळक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत करणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

MIDC Police Station : निंबळक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत करणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

0

MIDC Police Station : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक (Nimblak) परिसरात हातात धारदार कोयता घेऊन दहशत करणारा संशयित एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) ताब्यात घेतला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव

अजय संजय हारेर (वय ३१, रा. निंबळक ता. जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार निंबळक परिसरात हातात कोयता घेऊन गावात दहशत करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता ताब्यात घेतला असून राकेश खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

नक्की वाचा : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन

यांच्या पथकाने केली कारवाई (MIDC Police Station)

ही कारवाई नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, सहायक फौजदार राकेश खेडकर, पोलीस अंमलदार सचिन आडबल, संदीप पवार, संदीप पितळे, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव यांच्या पथकाने केली.