Case Registered : फर्निचर व्यावसायिकाला अडवून दोन लाखांची खंडणी; इस्टेट एजंटवर गुन्हा दाखल

Case Registered : फर्निचर व्यावसायिकाला अडवून दोन लाखांची खंडणी; इस्टेट एजंटवर गुन्हा दाखल

0
Case Registered : फर्निचर व्यावसायिकाला अडवून दोन लाखांची खंडणी; इस्टेट एजंटवर गुन्हा दाखल
Case Registered : फर्निचर व्यावसायिकाला अडवून दोन लाखांची खंडणी; इस्टेट एजंटवर गुन्हा दाखल

Case Registered : नगर : अहिल्यानगर शहरातील कापड बाजार परिसरात फर्निचर व्यावसायिकाला अडवून दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी (Extortion demand) करत मारहाण (Assault) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संशयित इस्टेट एजंट विरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) झाला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल

2 लाख द्यायचे, अन्यथा व्यवहार होऊ देणार नाही

इकराम तांबडकर (रा. घासगल्ली, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित इस्टेट एजंटचे नाव आहे. याप्रकरणी फिरोज तांबटकर (वय ३९, रा. घासगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. तांबटकर यांचे शहरात फर्निचरचे दुकान आहे. तांबटकर यांना त्यांचे शहाजी रोड येथील फ्लॅट विकायचे असल्याने त्यांनी तशी पाटी लावली होती. तांबटकर हे कापड बाजारातील एका हॉटेल परिसरात असताना, इस्टेट एजंट इकराम नजीर तांबडकर याने त्यांना गाठले. मी सांगेन त्यालाच फ्लॅट विकायचा आणि मला दोन लाख रुपये द्यायचे, अन्यथा व्यवहार होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार देताच संशयिताने त्यांना मारहाण केली.

नक्की वाचा : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered)

दोन लाख रुपये दिले नाही तर हातपाय तोडून टाकीन, अशी धमकी देत त्याने शिवीगाळ केली. उपस्थित नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.