Sri Guru Gobind Singh Ji Maharaj : श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराजांचा प्रकाश गुरुपूरब भक्तिभावात साजरा; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह मान्यवरांची उपस्थिती

0

Sri Guru Gobind Singh Ji Maharaj : नगर : शहरातील ऐतिहासिक गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा (Gurudwara Bhai Dayasinghji Govindpura) येथे शनिवारी (दि. 27 डिसेंबर) श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराज (Sri Guru Gobind Singh Ji Maharaj) यांचा 359 वा प्रकाश गुरुपूरब (जयंती), वीर बाल दिवस (Veer Bal Diwas) तसेच साहिबजाद्यांच्या शहिदीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. या पावन सोहळ्यासाठी शीख, पंजाबी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल

भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

या पवित्र पर्वानिमित्त दि. 15 डिसेंबर रोजी सेहज पाठ साहिब यांचा शुभारंभ करण्यात आला होता. या सेहज पाठाची सांगता आज भक्तिभावाने करण्यात आली. दरम्यान 15 ते 27 डिसेंबर या कालावधीत संगतच्या सहभागातून दररोज चौपाई साहिब पाठ आयोजित करण्यात आले. तसेच दि. 23 व 24 डिसेंबर रोजी पहाटे प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

Sri Guru Gobind Singh Ji Maharaj : श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराजांचा प्रकाश गुरुपूरब भक्तिभावात साजरा; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह मान्यवरांची उपस्थिती
Sri Guru Gobind Singh Ji Maharaj : श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराजांचा प्रकाश गुरुपूरब भक्तिभावात साजरा; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह मान्यवरांची उपस्थिती

नक्की वाचा : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन

वीर बाल दिवसानिमित्त विशेष कीर्तन (Sri Guru Gobind Singh Ji Maharaj)

शुक्रवारी (दि. 26 डिसेंबर) वीर बाल दिवसानिमित्त विशेष कीर्तन समागम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर आज श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराजांचा प्रकाश गुरुपूरब गुरुद्वारा साहिबमध्ये अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी हजुरी रागी जत्था भाई अमृतपाल सिंगजी व भाई हरदीप सिंगजी (फतेहगढ साहिब, पंजाब) यांच्या मधुर व भावस्पर्शी कीर्तनसेवेने संपूर्ण गुरुद्वारा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या धार्मिक सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त यशवंत डांगे तसेच गुणे आयुर्वेद कॉलेज संस्थेचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी गुरुद्वारास भेट देत दर्शन घेतले. त्यांनी शीख समाजबांधवांना प्रकाश गुरुपूरबच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गुरुद्वारा व शीख-पंजाबी समाजाच्या वतीने या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

Sri Guru Gobind Singh Ji Maharaj : श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराजांचा प्रकाश गुरुपूरब भक्तिभावात साजरा; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह मान्यवरांची उपस्थिती
Sri Guru Gobind Singh Ji Maharaj : श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराजांचा प्रकाश गुरुपूरब भक्तिभावात साजरा; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमप्रसंगी शीख समाज व गुरुद्वारा भाई दया सिंगजीचे अध्यक्ष बलदेवसिंग वाही यांनी सर्व संगत, सेवादारांच्या व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. या संपूर्ण कालावधीत मोठ्या संख्येने भाविकांनी कीर्तन, कथा व लंगर सेवेत सहभाग घेतला.

दरम्यान, रविवारी (दि. 28 डिसेंबर) रोजी साहिबजाद्यांच्या शहिदीस अर्पण म्हणून विशेष कीर्तन व कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुद्वारा भाई दया सिंगजी येथील सर्व सेवादारांच्या संयुक्त प्रयत्नातून हे सर्व धार्मिक कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले.