Hindavi Patil and Surekha Kudchi:हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

0
Hindavi Patil and Surekha Kudchi:हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
Hindavi Patil and Surekha Kudchi:हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

Hindavi Patil and Surekha Kudchi: आपल्या लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर भूरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील (Hindavi Patil) आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची (Surekha Kudchi) एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ (Jabrat Marathi Movie) या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांची रंगणार जुगलबंदी

या लावणीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज लावणीची जुगलबंदी यात पाहायला मिळत आहे. ही लावणी सादर करताना आम्ही आनंद घेतला हाच आनंद रसिकांना ही मिळेल,असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला.  

नक्की वाचा:  २०२५ मधील व्हायरल घटना कोणत्या? जाणून घ्या सविस्तर…   

किती सावरू पुन्हा पुन्हा
कशा झाकू या खाणाखुणा  
नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा

असे या लावणीचे बोल आहेत. डॉ.जयभीम शिंदे लिखीत शब्दांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. बेला शेंडेच्या स्वरातील या लावणीला डॉ.जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.

अवश्य वाचा:  MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे केली मागणी   

६ फेब्रुवारीला चित्रपट होणार प्रदर्शित 


‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. बेला शेंडे,आर्या आंबेकर,वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. येत्या ६ फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.