Attempt to kill : पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याचा प्रयत्न: योगेश गलांडे यांचा आरोप

Attempt to kill : पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याचा प्रयत्न: योगेश गलांडे यांचा आरोप

0
Attempt to kill : पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याचा प्रयत्न: योगेश गलांडे यांचा आरोप
Attempt to kill : पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याचा प्रयत्न: योगेश गलांडे यांचा आरोप

Attempt to kill : नगर : एमआयडीसी परिसरात (MIDC area) गुन्हेगारी प्रवृत्ती व दहशत वाढत असून त्याचाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. चिरंजीव दत्तात्रय गाढवे व आकाश उर्फ चिटट्या बबन दंडवते यांनी संगनमताने माझा व माझ्या कुटुंबाचा जिवे मारण्याचा पूर्वनियोजित कट (Attempt to kill) रचल्याचा गंभीर आरोप स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव तसेच युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे (Yogesh Galande) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच यासंदर्भात सोमवारी (ता.२९) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले आहे.

योगेश गलांडे हे एमआयडीसी परिसरात स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव तसेच युवा सेनेचे (शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच कामगाराचे प्रश्न, अडचणी व सामाजिक कार्यासाठी ते सातत्याने सक्रिय आहेत.

अवश्य वाचा: राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बंदूक व कोयत्याच्या जोरावर जिवे मारण्याचा प्रयत्न

शनिवारी (ता. २७) सकाळी सनफार्मा चौकात बिगर नंबरच्या निळ्या रंगाच्या कारने गलांडे यांच्या वाहनाला अडवून बंदूक व कोयत्याच्या जोरावर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधितावर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : निंबळक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत करणारा जेरबंद

एमआयडीसी परिसरात दहशतीचे वातावरण (Attempt to kill)

चिरंजीव गाढवे व आकाश दंडवते यांचे मागील १५ दिवसांचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासल्यास संपूर्ण कट उघड होईल, असा दावा गलांडे यांनी केला आहे. तसेच, आपल्यावर खोट्या खंडणी व चोरीच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचाही आरोप त्यानी केला. एमआयडीसी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक उद्योजक भयभीत असल्याने तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचेही त्यानी नमूद केले. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांची देखील भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नसल्याने त्यांची दहशत वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.