Knife Attack : नगर : केडगावातील एका वाईन्स शॉपवर चक्क कामगारानेच राडा घातल्याची घटना समोर आली आहे. ईतकच नव्हे तर वाईन्स शॉप मालकाच्या चुलत भावावर चाकूने सपासप वार (Knife Attack) केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) आरोपी छोटुकुमार ठाकूर (रा. बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Case registered) करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा : निंबळक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत करणारा जेरबंद
दारूस नकार दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक
केडगाव बायपासवरील वाईन्स मध्ये आरोपी छोटुकुमार ठाकूर काम करत होता. शनिवारी (ता. २७) रात्री त्यांने वाईन्स शॉप मालकाच्या चुलत भावाकडे दारूची मागणी केली. दारू देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आरोपी छोटुकुमार ठाकूरने धारदार शस्राने आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत मालकाच्या चुलत भावावर सपासप वार केले.
अवश्य वाचा: राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जखमीला तातडीने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवले(Knife Attack)
जखमी तरुणाला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यास पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहेत.



