Mahapalika Elections:राज्यात कोणाची कोणासोबत लढत;कुठे युती कुठे आघाडी? जाणून घ्या…   

0
Mahapalika Elections: राज्यात कोणाची कोणासोबत लढत;कुठे युती कुठे आघाडी? जाणून घ्या...   
Mahapalika Elections: राज्यात कोणाची कोणासोबत लढत;कुठे युती कुठे आघाडी? जाणून घ्या...   

नगर : राज्यातील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (Mahapalika Elections) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहे. त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवत त्या संदर्भातील यादी जाहीर केली आहे. जागावाटपाच्या वाटाघाटीमुळे महायुती(Mahayuti), महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)मोठी राजकीय उलथापालथ होऊन युती-आघाडी फिस्कटल्याचे चित्र दिसत आहे. आता नेमकं कोण कुणा विरोधात लढणार आहे? तर कुठे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या बाबत जाणून घेऊ…

नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?

मनपासाठी मविआ महायुतीचं कुठे ठरलं, कुठे अडलं ? (Mahapalika Elections)

मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरेंचा मनसे पक्ष मुंबईत एकत्र निवडणूक लढणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने वंचितची साथ घेत मुंबई महानगर पालिकेमध्ये आपले शिलेदार उतरवले आहे. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची युती झाली आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात युती झाली आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी शिवसेना उबाठा गट आणि राज ठाकरेंचा मनसे पक्ष एकत्र निवडणूक लढणार असून काँग्रेसने स्वबळाचा नारा देत एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य वाचा: हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड   

 नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार  (Mahapalika Elections)

नाशिक महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणूक लढणार आहे. तर दुसरीकडे भाजप हा स्वबळावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचे चित्र आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती फिस्कटल्याची माहिती असताना अजित पवार यांची राष्ट्रवादी इथं स्वबळावर लढणार असल्याची माहिती आहे.