
Municipal Corporation Election : नगर : महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या आदेशानुसार, शहर वाहतूक शाखेने (City Traffic Police) शहरात अचानक नाकाबंदी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरूध्द कठोर मोहिमेचा बडगा उगारला.
नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?
१३९ संशयास्पद वाहनांची कसून तपासणी
या मोहिमेत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी दोन टप्प्यात तपासणी केली. दुपारी प्रोफेसर चौक आणि सायंकाळी भिस्तबाग चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी १३९ संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये सिट बेल्ट न लावणे, वाहनांना काळ्या काचा असणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्या एकूण ६८ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
अवश्य वाचा: महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाई (Municipal Corporation Election)
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या दोन चालकांवरही यावेळी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी ३ हजार ५०० रूपये रोख दंड वसूल केला असून, वाहनचालकांचा ५८ हजार रूपयांचा थकीत दंडही नियमानुसार भरून घेण्याची प्रक्रिया केली. निवडणुकीच्या काळात शहरात शिस्त राहावी, यासाठी ही विशेष मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहेत. या कारवाईत अंमलदार आण्णासाहेब परदेशी, मन्सूर सय्यद, रामराव शिरसाठ, गणेश आरणे, संजय घोरपडे, जयश्री सुद्रीक यांचे पथकाने कारवाई केली.


