Local Crime Branch : श्रीरामपूर शहरात घरफोडी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : श्रीरामपूर शहरात घरफोडी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : श्रीरामपूर शहरात घरफोडी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : श्रीरामपूर शहरात घरफोडी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : श्रीरामपूर (Shrirampur) परिसरात घरफोडी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथून ताब्यात घेतले आहे.

अवश्य वाचा: महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

समीर शब्बीर शेख (वय- २८, रा. खटकळी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी जि. अहिल्यानगर), सरफराज मुश्ताक सय्यद (रा. इस्लामपुरा देवळाली प्रवरा ता. राहुरी), अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर विजय इथापे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), हा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.

नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?

राहुरी, नेवासा, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Local Crime Branch)

ताब्यात घेतलेल्या समीर शब्बीर शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पारनेर, सोनई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. तर सरफराज मुश्ताक सय्यद याचेविरुध्द राहुरी, नेवासा तसेच गंगापूर (जि.छ.संभाजीगनर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, भगवान थोरात, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.