Gunfire : श्रीरामपूर पुन्हा हादरले; बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार; गोळीबारात जहागीरदार गंभीर जखमी

Gunfire : श्रीरामपूर पुन्हा हादरले; बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार; गोळीबारात जहागीरदार गंभीर जखमी

0

Gunfire : श्रीरामपूर: शहरातील कॉलेज रोड परिसरातील संतलुक हॉस्पिटल जवळ आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार (Bunty Jahagirdar) यांच्यावर गोळीबार (Gunfire) केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?

साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल

शहरातील कॉलेज रोड परिसरातील कब्रस्तान येथून एका अंत्यविधीवरून परतत असताना जर्मन हॉस्पिटल जवळ जहागीरदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शहरातील साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह फॉरेन्सिकच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

अवश्य वाचा: महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात (Gunfire)

घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेनंतर बंटी जागीरदार समर्थकांचा मोठा जमाव साखर कामगार हॉस्पिटलसमोर जमा झाला होता. मोटारसायकलवरुन आलेले हल्लेखोर कोण होते? कोणत्या कारणाने जहागीरदार यांच्यावर हा हल्ला करण्यात आला याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.