Nashik-Solapur-Akkalkot Corridor : केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) आज एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या (Nashik-Solapur-Akkalkot Corridor) बांधकामाला मंजुरी (Construction Approval) दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Union Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने हा १९,१४२ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे.
नक्की वाचा : १५ जानेवारीला महाराष्ट्रात ‘पगारी सुट्टी’अनिवार्य; सुट्टी न दिल्यास होणार ‘ही’ कारवाई
अश्विनी वैष्णव नेमकं काय म्हणाले? (Nashik-Solapur-Akkalkot Corridor)

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की,“पहिला प्रकल्प नाशिक आणि सोलापूरला जोडणारा सहा लेनचा अॅक्सेस-कंट्रोल्ड एक्सप्रेसवे आहे. हा प्रकल्प एका प्रकारे विकसित भारताच्या सोनेरी चौकोनाचे प्रतिनिधित्व करतो. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरने मोठी प्रगती केली आहे, हा मुंबई-चेन्नई कॉरिडॉर आहे.आज ज्या सेक्शनला मंजूरी मिळाली तो नाशिक ते अक्कलकोट असा असणार आहे. यापुढे हा कॉरिडॉर कुरनूल, कडप्पा, चेन्नई पर्यंत वाढवला जाईल. मात्र,आज नाशिक-सोलापूर कॉरिडॉरला मंजूरी देण्यात आली आहे”.
अवश्य वाचा: खुशखबर!भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
कसा असेल कॉरिडॉर? (Nashik-Solapur-Akkalkot Corridor)
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉर प्रकल्पामध्ये सहा-लेन अॅक्सेस कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड हायवेचे बांधकामाचा समावेश आहे. हा हायवे सुरत-चेन्नई हाय स्पीड कॉरिडॉरचा भाग आहे, जो पश्चिम भारताला दक्षिणेशी जोडतो. हा कॉरिडॉर अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणार आहे. याचे काम दोन वर्षांमध्ये होणार आहे. हा प्रकल्प आता आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘बीओटी’ प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक ते अक्कलकोट प्रवास ४ तासांत होणार (Nashik-Solapur-Akkalkot Corridor)
नाशिक ते अक्कलकोट असा ३७४ किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास नऊ तासांऐवजी चार तासांत करता येणार आहे. नाशिक ते अक्कलकोट महामार्ग नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट अशा दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. नाशिक ते अहिल्यानगर टप्पा १५२ किमीचा तर अहिल्यानगर ते अक्कलकोट टप्पा २२२ किमी असेल.
३७४ किमीचा हा महामार्ग सुरु झाल्यास नाशिक ते अक्कलकोट अंतर केवळ चार तासांत पार करता येणार आहे. आज हे अंतर पार करण्यासाठी नऊ तास लागतात. सुरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते सुरत अंतर दोन तासात पार करता येणार आहे. चेन्नई ते सुरत महामार्ग नवसारी येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढे दिल्लीकडे जाणेही सोपे होणार आहे.



