Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26

0
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26

निवडणूक प्रक्रियेचा मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून आढावा
Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक (Ahilyanagar Municipal Corporation Election) 2025-26च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) मा मुख्य निवडणूक निरीक्षक मा श्री आदित्य जीवने (IAS )सह व्यवस्थापकीय संचालक विदयुत वितरण पारेषण छ. संभाजीनगर व श्रीमंत हरकर अतिरिक्त जिल्हाधिकारी जळगाव यांनी शहरात सखोल पाहणी करून अहिल्यानगर मनपा निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देत आज संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेतली.

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26

स्ट्रॉंग रूमची तपासणी

यावेळी निरीक्षकांनी स्ट्रॉंग रूमची तपासणी करत सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. स्ट्राँग रूममध्ये दरवाजे, खिडक्या व सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत पद्धतीने बसवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच शहरातील आंनंदनगर शाळेतील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील मूलभूत सुविधा, सुरक्षितता व्यवस्था आणि व्यवस्थापनाचा आढावा घेतला.

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26

FLC प्रक्रियेबाबत सूचना (Ahilyanagar Municipal Corporation Election)

मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केडगाव येथील पाच गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVM) होत असलेली FLC प्रक्रियेबाबत भेट देऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.

मनपा मुख्यालयात निवडणूक अधिकारी , आचारसंहिता चे नोडल अधिकारी त्याचबरोबर खर्च तपासणी पथक प्रमुख , शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या सोबत बैठक घेतली. मागील निवडणुकीत झालेल्या मतदान टक्केवारी पेक्षा यावर्षी मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात sveep ऍक्टिव्हिटी वाढवाव्यात अश्या सूचना दिल्या.

Ahilyanagar Municipal Corporation Election
Ahilyanagar Municipal Corporation Election

निवडणुकीदरम्यान अवैध हालचालींना आळा घालण्यासाठी महामार्गावरील तपासणी नाक्यांवर (चेक पोस्ट) कडक वाहन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच पोलिस प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील भागांची माहिती घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यावेळी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यशवंत डांगे, शहर पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक जगदीश भांबळ, कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजी गायकवाड, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या पाहणीमधून देण्यात आला.