Grahak Melawa : अकोले : येथील तहसील कार्यालयात मंगळवारी (ता.३०) ग्राहक मेळाव्याचे (Grahak Melawa) आयोजन करण्यात आले होते. यमाध्ये ग्राहक (Customer) व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर तक्रारींचा पाऊस पाडला.
अवश्य वाचा: युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी
व्यासपीठावर उपस्थिती
तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्यास ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले, महावितरण कंपनीचे शेळके, डॉ. सुनील शिंदे, अनंत घाणे, भाऊसाहेब वाकचौरे, माधव तिटमे, प्रमोद मंडलिक, वसंत बाळसराफ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्व. बिंदू माधव जोशी व जागतिक कीर्तीचे शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नक्की वाचा : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून आढावा
विविध विषयांवर चर्चा (Grahak Melawa)
ग्राहक दिनाला यावेळी ग्राहकांची विक्रमी उपस्थिती होती. मात्र प्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्याने तहसीलदार डॉ. मोरे यांनी सुरुवातीलाच अधिकारी जरी उपस्थित नसले तरी सर्व अर्जांचा त्या त्या अधिकार्यांकडून निराकरण करण्याची ग्वाही दिली. मात्र कार्यकर्ते व ग्राहक याबाबत मुख्य अधिकारीच जर नसेल तर प्रश्न कसे सुटणार असा प्रश्न विचारत होते. त्यावर तहसीलदारांनी संबंधितांना नोटीस पाठवणार असून विचारणा करणार असल्याने सांगितले. या मेळाव्यात नगरपंचायतची कर मूल्यांकन आकारणी, अकृषिक वापराची सनद (औद्योगिक प्रयोजन), महसूल बाबतच्या अर्जावर चर्चा झाली. तसेच नाशिक-पुणे रेल्वे, घरगुती गॅस, शहरातील ड्रेनेजचे पाणी, कोल्हार-घोटी राज्यमार्गावर असलेली अपुरी कामे, अकोले ग्रामीण रुग्णालय, शिधापत्रिका, अवैध व्यवसाय, 32 गाव पाणीपुरवठा योजना, बिबट्यांचे हल्ले, भूमी अभिलेख, बीएसएनएल आदी विषयांवर चर्चा झाली. सूत्रसंचालन राम रुद्रे यांनी करत आभार मानले.



