National Road Safety Month : “रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा” या संकल्पनेवर १ ते ३१ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

National Road Safety Month : "रस्ता सुरक्षा - जीवन रक्षा" या संकल्पनेवर १ ते ३१ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

0
National Road Safety Month :
National Road Safety Month : "रस्ता सुरक्षा - जीवन रक्षा" या संकल्पनेवर १ ते ३१ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

National Road Safety Month : नगर : देशभरातील रस्ते अपघातांचे (Road Accident) प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने १ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना’ (National Road Safety Month) साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी दिली.

अवश्य वाचा: युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी

विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या अभियानाबाबत दिलेल्या निर्देशानुसार १ ते ३१ जानेवारी या कालावधीमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून आढावा

वाहतुक नियम पाळावेत यासाठी जनजागृती (National Road Safety Month)

यामध्ये प्रामुख्याने रहदारी व वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करणे, वाहनचालकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा व सुरक्षा शिबिरे आयोजित करणे, युवकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत साक्षरता निर्माण करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमधून निबंध स्पर्धा, चित्रकला, पथनाट्ये आदी उपक्रमांचे आयोजन करणे, व्यावसायिक वाहनचालकांसाठी मोफत डोळ्यांची तपासणी व आरोग्य शिबिरे आयोजित करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे.


रस्ते सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी तर आहेच परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित असते. ‘रस्ते सुरक्षा – जीवन रक्षा’ ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना असून सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व संपूर्ण जानेवारी महिन्यात चालणारे हे अभियान सर्वांनी मिळून यशस्वी करावे, असे आवाहन घार्गे यांनी केले आहे.