
Municipal Election : नगर : महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर प्रचार फेऱ्यांच्या निमित्ताने उद्भवणाऱ्या तणावपूर्ण घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक प्रचार फेरीचे पोलिसांकडून स्वतंत्रपणे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Inspector General of Police) दत्तात्रय कराळे (Dattatray Karale) यांनी दिले आहेत. निवडणूक यंत्रणेमार्फत प्रचारफेरीचे चित्रीकरण होत असले तरी त्याशिवाय पोलिसांकडूनही स्वतंत्र नोंद ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे अहिल्यानगर जिल्हा (Ahilyanagar District) दौऱ्यावर असून त्यांनी जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी सुरू केली आहे.
अवश्य वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल – डॉ. सुजय विखे
विशेष दक्षता घेण्याच्या सूचना
बुधवारी (ता. ७) त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. कराळे यांनी पोलिसांना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक संदर्भातील प्रत्येक तक्रार, तसेच अदखलपात्र गुन्ह्यांची तातडीने दखल घ्यावी, घटनास्थळी त्वरित भेट देऊन पाहणी करावी, तसेच शहरातील विविध भागांत रूट मार्चचे आयोजन करून पोलीस सतर्क असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
नक्की वाचा: मातब्बर नेत्यांची डोकेदुखी वाढली! तांबोळी आणि निस्ताने यांच्या रूपाने भाजपने खेळले ‘एज्युकेशन कार्ड
जिल्ह्यात उपलब्ध असलेले पोलीस बळ पुरेसे (Municipal Election)
निवडणूक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेले पोलीस बळ पुरेसे असल्याने बाहेरून अतिरिक्त पोलीस मागवण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे कराळे यांनी सांगितले. यासोबतच गृहरक्षक दलाचे ९०० जवान आणि राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


