नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महाराष्ट्राचे आका आहेत,अशी जहरी टीका (Criticism) भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांनी केली आहे. एक तर तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार (Corruption) लपवायला भाजपमध्ये आले आहेत.आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा,असे लांडगे म्हणाले होते. महेश लांडगे यांच्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर (Reply) दिलं आहे. मी कोण आहे हे जनता ठरवेल,असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी महेश लांडगेंनी केलेल्या वक्तव्यावर दिले आहे. अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
नक्की वाचा : काँग्रेस अन् एमआयएमसोबत युती खपवून घेणार नाही;देवेंद्र फडणवीसांचा इशारा
महेश लांडगे नेमकं काय म्हणाले? (Ajit Pawar on Mahesh Landge)

पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे,असा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर लांडगे ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु नयेत,असे लांडगे म्हणाले. मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पाहा, असेही लांडगे म्हणाले. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? असा सवाल देखील लांडगेंनी केला आहे.
अवश्य वाचा: ‘दोन्ही पवार कधीच वेगळे नव्हते हे राज्याला आता दिसून येईल’-लक्ष्मण हाके
अजित पवारांनी काय उत्तर दिले ? (Ajit Pawar on Mahesh Landge)
महेश लांडगेंच्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी कोण आहे जनता ठरवेल. १५ तारखेपर्यंत कळ काढा उत्तर देतो,असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून एक अलार्म पाच काम ही मोहीम सुरू होत आहे. पुण्यातील खड्डे, कचरा, गुन्हेगारी, पाणीटंचाई या मुद्द्यांवर रॅप सॉंगमधून भाजपच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे. हे गाणं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या कारभाराबद्दल आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराबाबत हे नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कचरा, वाहतूक कोंडी, तुटलेले रस्ते, पाणीटंचाई, गुन्हेगारी हे पुण्याचे अलार्म आहेत, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. आपण जे गाणं तयार केलं आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवडपुरते मर्यादित आहे. केंद्र आणि राज्य सरकार याचा कुठेही संबंध नाही,असे अजित पवार म्हणाले. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जाते, त्याचा फटका नागरिकांना बसतो, असेही अजित पवार म्हणाले.



