Sangram Jagtap : अहिल्यानगरच्या नामांतराला विरोध करणाऱ्यांविरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक

Sangram Jagtap : अहिल्यानगरच्या नामांतराला विरोध करणाऱ्यांविरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक

0
Sangram Jagtap : अहिल्यानगरच्या नामांतराला विरोध करणाऱ्यांविरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक
Sangram Jagtap : अहिल्यानगरच्या नामांतराला विरोध करणाऱ्यांविरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक

Sangram Jagtap : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी (Ahilyanagar Municipal Corporation Election) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. आज ( 8 जानेवारी) रोजी युतीच्या उमेदवारांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत बोलताना अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी नामांतरावरुन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत अहिल्यानगर (Ahilyanagar) शहराचे नाव बदलून देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.

अवश्य वाचा: पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे

युती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवणार

या सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, जिल्ह्याचे नामांतरण झाल्यापासून ही पहिली महापालिका निवडणुक होत असून युती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काही लोक सांगत आहे की, जर आमच्या विचाराचे लोक निवडून दिले तर आम्ही पुन्हा एकदा जिल्ह्याच नाव बदलणार. त्यामुळे आता 15 जानेवारी रोजी आपल्या मतदानाच्या माध्यमांतून दाखवायचा आहे की आपल्याला काय मान्य आहे, असं या सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले. तसेच जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही अहिल्यानगरच नाव बदलून देणार नाही अशी ग्वाही देखील आमदार जगताप यांनी दिली.

नक्की वाचा: रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, (Sangram Jagtap)

आम्ही विकास करत आहोत आणि पुढे देखील करणार. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती झाली असून नागरिकांना पाच वर्ष वेळ देणारी उमेदवार आम्ही दिली आहे. तसेच नगर शहर वाढत असल्याने आता मोठ्या निधीची देखील आवश्यकता असल्याने निवडणुका झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात यावी अशी मागणी देखील आमदार संग्राम जगताप यांनी या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

अवश्य वाचा : ले ग्रँड रेक्समध्ये एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

अहिल्यानगरमध्ये डिफेन्स कॉरिडॉर तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

तर दुसरीकडे या सभेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असून अहिल्यानगरची जनता आपल्याला निवडून देणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच अहिल्यानगर पालिकेला 492 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देऊ असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 30 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिली असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर अहिल्यानगरमध्ये डिफेन्स कॉरिडॉर तयार करणार असल्याची देखील मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत बोलताना केली.