Distribution of Money to voters : मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याची तक्रार; एक लाखांची रोकड जप्त, भरारी पथकाची कारवाई

Distribution of Money to voters : मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याची तक्रार; एक लाखांची रोकड जप्त, भरारी पथकाची कारवाई

0
Distribution of Money to voters : मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याची तक्रार; एक लाखांची रोकड जप्त, भरारी पथकाची कारवाई
Distribution of Money to voters : मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याची तक्रार; एक लाखांची रोकड जप्त, भरारी पथकाची कारवाई

Distribution of Money to Voters : नगर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच, भरारी पथकाने तोफखाना भागात एक दुचाकी जप्त करून त्यातून एक लाखाची रोकड हस्तगत केली होती. या प्रकरणी निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

भरारी पथकाचे प्रमुख वामन गणपतराव घोळवे यांनी फिर्याद दिली आहे. ते आपल्या पथकासह गस्तीवर असताना तोफखाना भागातील मोहनबाग येथे काही व्यक्ती पैसे वाटप करत (Distribution of money to voters) असल्याची माहिती त्यांना मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तेथे दोन मोपेड दुचाकी संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एका दुचाकीची तपासणी करून ती सोडून देण्यात आली. तर दुसऱ्या दुचाकीबाबत कोणीही समोर न आल्याने ती जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. त्याची तपासणी केली असता, त्यात एक लाख रुपये रोकड, ‘मायकल कोअर्स’ आणि ‘हॅपी स्पोर्ट्स’ कंपनीची दोन महागडी घड्याळे व इतर वस्तू आढळून आल्या. पंचनामा करून १ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवश्य वाचा : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी (Distribution of Money to voters)

सदर दुचाकी फैजान कुतुबुद्दीन जमादार (रा. मुकुंदनगर) याची असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला नोटीस बजावून पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्याने पुरावे सादर न केल्याने सदर रक्कम मतदारांना वाटपासाठी असल्याच्या संशयावरून त्याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. महापालिकेने सहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातही आचारसंहिता कक्ष करण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास आचारसंहिता कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल