Theft : श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलिसांनी (Police) धाडसी कारवाई करत एका मोठ्या चोरीच्या (Theft) गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना (Accused) अटक केली असून त्यांच्याकडून ११ लाख ५० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
३ लाखांचा कॅमेरा आणि ३८ हजारांची रक्कम हिसकावून नेली
प्रसाद तात्याराम झराड (वय २५, रा. बेलवंडी कोठार, श्रीगोंदा), प्रतिक बिभीषण कराळे (वय २१, रा. बोरुडी, आष्टी), विनायक गौतम दांगडे (वय २२, रा. देऊळगाव गलांडे, श्रीगोंदा) आणि युवराज सुनील पठारे (वय २१, रा. बाळेवाडी, आष्टी) यांना अटक करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी ओम संतोष शिंदे (वय २३) हे व्यावसायिक फोटोग्राफर असून ३ जानेवारी रोजी आपल्या वडाळी रोडवरील जंगलात फोटोशूटसाठी गेले असता पावणे पाचच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांसह प्लास्टिक पाईप व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडील ३ लाख रुपये किमतीचा कॅमेरा आणि ३८ हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून नेली होती.
हेही वाचा : जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
पाठलाग करत तिघांना घेतले ताब्यात (Theft)
श्रीगोंदा पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करत संशयास्पद वाटणाऱ्या एका स्विफ्ट कारचा पाठलाग करत असताना मांडवगण फाट्याजवळ तिघांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, विना नंबरची बुलेट गाडी, मारहाणीसाठी वापरलेला लोखंडी रॉड आणि आरोपींनी घातलेले मास्क एकूण ११ लाख ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर आरोपींना ९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे पथक करत आहेत.
अवश्य वाचा : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे



