Jai Bajrang School : पासवर्ड वाचन अभियानातील निबंध स्पर्धेत जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

Jai Bajrang School : पासवर्ड वाचन अभियानातील निबंध स्पर्धेत जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

0

Jai Bajrang School : नगर: जिल्हा परिषद अहिल्यानगर (Zilla Parishad Ahilyanagar), तसेच शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) अहिल्यानगर आणि युनिक फीचर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, करण्यात आलेल्या पासवर्ड वाचन अभियानांतर्गत निबंध स्पर्धेत आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग विद्यालयाच्या (Jai Bajrang School) दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१० शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश

या स्पर्धेत जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर येथील इ. ८ वी ची सेजल ज्ञानदेव दळवी या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक पटकावला तर जय बजरंग प्राथमिक विभागाची इ. ७ वी मधील विद्यार्थिनी साक्षी दिनेश माळवे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात १० शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता.

Jai Bajrang School : पासवर्ड वाचन अभियानातील निबंध स्पर्धेत जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
Jai Bajrang School : पासवर्ड वाचन अभियानातील निबंध स्पर्धेत जय बजरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

अवश्य वाचा : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे

दोन्ही विद्यार्थिनींचे सर्वांकडून अभिनंदन (Jai Bajrang School)

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या पासवर्ड वाचन कार्यशाळेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील उपस्थित होते.
या यशाबद्दल आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, तसेच सहसचिव उमेश गांधी, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर, प्राचार्या संगीता मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल