
Asaduddin Owaisi: ‘एकदिवस असा येईल हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल’,असं वक्तव्य सोलापुरात प्रचाराच्या वेळी एमआयएमचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केले आहे. शुक्रवारी (ता.९) सोलापुरात (Solapur)प्रचाराच्यावेळी ओवैसीनी हे वक्तव्य केलं आहे. ओवैसींनी पाकिस्तानच्या संविधानाचा उल्लेख ही प्रचारात केला. “एकाच समाजाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती बनेल असं पाकिस्तानच्या संविधानात लिहिले आहे. पण भारताच्या संविधानात सर्व समाजाच्या लोकांचं एकच स्थान आहे. आपण तेव्हा नसू, पण एकदिवस असा येईल, जेव्हा हिजाब घालणारी मुलगी (A girl wearing a hijab)भारताची पीएम (India’s PM) बनेल” असं असदुद्दीन ओवैसी बोलले.
नक्की वाचा: ‘मी कोण आहे हे जनता ठरवेल’;महेश लांडगेंच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर
‘भाजप, शिंदे व अजित पवार हे महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवत आहेत’ (Asaduddin Owaisi)
ओवेसी पुढे म्हणाले की, “लक्षात ठेवा मुस्लिमांबद्दल तुम्ही हा जो द्वेष पसरवताय, तो जास्त काळ टिकणार नाही. द्वेष पसरवणारे संपून जातील. आज तुम्ही बघा, सोलापूरमध्ये १०४ रुपयात एक लिटर पेट्रोल मिळतं. पेट्रोलचे कोणी रेट विचारले, तर त्याला बांग्लादेशी ठरवलं जातं” अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. “सोलापुरात इतके मुद्दे आहेत, इतक्या समस्या आहेत. पण सत्ताधाऱ्यांना त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. भाजप, शिंदे आणि अजित पवार तिघांचा महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला आवाहन करतो, या १५ तारखेला तुम्ही त्यांना संदेशा द्या, तुमच्या कारस्थानाला आम्ही बळी पडणार नाही” असं ओवैसी म्हणाले.
अवश्य वाचा: अजित दादा वाघ,आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही;अमोल मिटकरींचा भाजपवर पलटवार
‘महायुती सरकारला शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही’ (Asaduddin Owaisi)
“फडणवीस, शिंदे आणि पवार हे भारताच्या संविधानानुसार राजकारण करत नाहीत. द्वेषाच्या बळावर हुकूमशाही करत आहेत. हे अल्पसंख्यांक समाजाचे मित्र नाही, त्यांना कमजोर करायचा इरादा ठेवतात. यांना दलितांना त्यांचा हक्क द्यायचा नाही. त्यांना हक्कापासून वंचित ठेवायचं आहे. यांना शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही. तुम्ही पाहू शकता किती आत्महत्या होतायत ते” अशा शब्दात ओवैसी यांनी महायुतीवर टीका केली.


