
Indian Army soldier death : साताऱ्यात (Satara News) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचे साताऱ्यात अपघातामध्ये निधन (The soldier died in an accident) झालं आहे. हा जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला होता, पण काळाने घाला घातला. प्रमोद परशुराम जाधव (Pramod Jadhav)असे अपघाती निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. खेदाची बाब म्हणजे लेकीचा जन्म (The birth of a Daughter) होण्याआधी काही तास प्रमोद परशुराम जाधव यांचं निधन झाले आहे. काही तासांपूर्वीच जन्मलेल्या नवजात बालिकेला जन्म घेताच आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घ्यावं लागलं. हा क्षण प्रत्येकाचे काळीज चिरणारा ठरला आहे.
नक्की वाचा: महापालिका निवडणुकीत ४ EVM वर मतदान करावे लागेल!पूर्ण मतदान कसं करायचं?
सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा साताऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सातारा तालुक्यातील दरे या गावचे प्रमोद परशुराम जाधव असे जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील त्यांची पत्नी आणि नवजात मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
नेमकी घटना कशी घडली ? (Indian Army soldier death)
वीर जवान प्रमोद यांना आई नसल्यामुळे ते पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आठ दिवसांसाठी सुट्टीला गावी आले होते. यादरम्यान काही कामानिमित्त वाढे फाटा येथे दुचाकीवर जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे दरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरली आहे. अपघाताची बातमी कळताच कुटुंबीयांसह गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.आज सकाळी वीर जवान प्रमोद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. पित्याच्या मृत्यूची बातमी आणि घरात आलेला नव्या जीवाचा आनंद, या दोन्ही भावनांनी कुटुंबीय हादरून गेले.
अवश्य वाचा: ‘एकदिवस हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान बनेल’;असदुद्दीन ओवैसी यांचं सोलापुरात वक्तव्य
काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेने घेतले अंत्यदर्शन (Indian Army soldier death)
अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी यांना स्ट्रेचरवर आणि काही तासांपूर्वीच जन्मलेल्या चिमुकल्या मुलाला पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


