Radhakrushna Vikhe Patil:’साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही 

0
Radhakrushna Vikhe Patil:'साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही 
Radhakrushna Vikhe Patil:'साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही 

नगर : साकळाई पाणी योजनेच्या (Saklai Water Scheme) कामाची सुरूवात येत्या पंधरा दिवसात करून लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्याची ग्वाही (We will make the villages drought-free) जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली आहे. तालुक्यातील सारोळे कासार (Sarola Kasar)येथे सुमारे ३ कोटी रुपयाच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा : दुर्दैवी!भारतीय जवानाचा लेकीच्या जन्माआधीच मृत्यू;नवजात बालिकेने घेतले पित्याचे अंत्यदर्शन  

‘साकळाई योजनेचे काम पूर्ण करून कर्डिलेंचे स्वप्न पूर्ण करणार’ (Radhakrushna Vikhe Patil)

साकळाई योजनेचे काम पूर्ण करून स्व.शिवाजीराव कर्डीले यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की, वर्षानुवर्ष पाण्याची प्रतिक्षा या भागातील लोकांना करावी लागली. महायुती सरकारने साकळाईच्या सर्व कामांना मंजुरी दिली आहे. पुढील पंधरा दिवसात कामाला सुरूवात करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे स्पष्ट करतानाच, साकळाईच्या कामामुळे सारोळा कासार येथील २९५ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येवून १३  बंधाऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल ही भूमिका ठेवून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या विकसित भारत जी राम जी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला ३कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाचे नियोजन करताना १२५ दिवसांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आल्याचं विखेंनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ समाज घटकांना मिळत आहे. सुरू केलेली एकही योजना बंद नाही. कोव्हीड नंतर सुरू झालेल्या मोफत धान्य योजनेची मुदत वाढविण्यात आली असून,लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

अवश्य वाचा: महापालिका निवडणुकीत ४ EVM वर मतदान करावे लागेल!पूर्ण मतदान कसं करायचं?  

संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून आपला जिल्हा नावारूपाला येईल (Radhakrushna Vikhe Patil)

कुकडी कालव्याच्या कामांना ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून कालव्याचे काम मार्गी लगल्यानंतर आवर्तनाचा चाळीस दिवसांचा कालावधी कमी होईल. शेवटच्या गावाला पाणी मिळावे म्हणून पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा विचार जलसंपदा विभाग करीत आहे. जिल्ह्यात रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असून राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत असलेल्या गुंतवणूकीचा फायदा जिल्ह्याला कसा होईल, हा प्रयत्न आहे. संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून आपला जिल्हा नावारूपाला येईल. दळणवळणाची साधन उपलब्ध होत आहेत. छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रानी फिल्ड मार्ग होत आहे. जिल्हा मोठ्या औद्योगिक नगरांना जोडला जात असल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे काम युवकांच्या भवितव्याच्या दृष्टीने करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

घोसपुरी येथे माजी सैनिकांनी उभारलेल्या कमानीचे लोकार्पण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सैनिकांच्या त्यागाला समाज विसरून जातो, अशी खंत व्यक्त करून राष्ट्र प्रथम ही भावना असली पाहीजे. जिल्ह्यातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या विचाराने अकोला जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या स्मारकाप्रमाणे आपल्या जिल्ह्यात स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, उद्योजक दिलीप दाते, सरपंच आरती कडूस,रविंद्र कडूस,योगिता निंभोरे, सरपंच किरण साळवे, संतोष खोबरे दादाभाऊ चितळकर, रंगनाथ निमसे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.