Ratanlal Songra : मानवतावादी विचारांचे ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांचे निधन

Ratanlal Songra : मानवतावादी विचारांचे ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांचे निधन

0
Ratanlal Songra : मानवतावादी विचारांचे ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांचे निधन
Ratanlal Songra : मानवतावादी विचारांचे ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांचे निधन

Ratanlal Songra : नगर : आपल्या साहित्याच्या माध्यमातून रसिक वाचकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक (Senior writer) आचार्य रतनलाल सोनग्रा (Ratanlal Songra) (वय ८७) यांचे रविवारी (११ जानेवारी) दुपारी पुण्यातील (Pune) खासगी रुग्णालयात वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोमवारी सकाळी नऊ ते साडेदहापर्यंत त्यांच्या विमाननगर येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सकाळी साडेअकरा नंतर येरवडा येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नक्की वाचा: तुम्ही दादागिरी ची भाषा मला शिकवू नका, तो धंदा आमचा : मंत्री गुलाबराव पाटील

अहिल्यानगर सोबत जूना भावनिक संबंध

त्यांचा अहिल्यानगर सोबत भावनिक संबंध आहे. त्यांची कर्मभूमी पुणे असली, तरी त्यांच्या जीवनाची जडणघडण आणि सुरुवातीचा काळ नगरशी जोडलेला आहे. त्यांचे शिक्षण अहमदनगर महाविद्यालयात झाले. येथेच त्यांच्या वैचारिक आणि साहित्यिक प्रवासाची पायाभरणी झाली.

हे देखील वाचा: मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले

एकेकाळचे नवनीतभाई बार्शीकरांचे प्रखर विरोधक (Ratanlal Songra)

रतनलाल सोनग्रा हे सुरवातीच्या काळात राजकारणात असताना काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. नगरचे दिग्गज नेते आणि माजी आमदार स्वर्गीय नवनीतभाई बार्शीकर यांचे ते एकेकाळी प्रखर विरोधक होते, मात्र त्यानंतर बार्शीकरांनी केलेल्या विकासावर प्रभावित होऊन त्यांच्या विकासकामांचे जाहीर कौतुकही केले होते.

रतनलाल सोनग्रा यांचे कुटुंब हे मूळचे राजस्थानमधील (मारवाड प्रांत) असल्याचे मानले जाते, परंतु त्यांच्या पिढ्यान-पिढ्या महाराष्ट्रात, विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर भागात रहिवासी म्हणून राहिले. त्यामुळे ते मनाने आणि संस्काराने पूर्णतः महाराष्ट्रीय होते. त्यांच्या कन्या अ‍ॅड. आरती सोनग्रा (घुले) या देखील नगर-पुणे परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.

रतनलाल सोनग्रा यांनी आपल्या लेखनातून समाजातील शोषित समाजाचे दुःख आणि संघर्ष मांडला आहे. त्यांच्या साहित्यात कादंबरी, कथासंग्रह आणि कवितांचा समावेश होतो. तडा ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. दलित जीवनातील संघर्ष आणि ग्रामीण सामाजिक वास्तव यात प्रभावीपणे मांडले आहे. झोंब ही ग्रामीण भागातील जीवन संघर्षावर आधारित आहे. तर​आक्रोश ही अन्यायाविरुद्धचा आवाज उठवणारी कलाकृती आहे. कबीरवाणी हे त्यांचे पुस्तकही गाजले. कादंबरी आणि कथांशिवाय त्यांनी कवितेच्या माध्यमातूनही आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांच्या कवितांमधून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा रोष आणि समतेची अपेक्षा दिसून येते.