Radhakrishna Vikhe Patil : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे ‘परफॉर्मन्स ऑडिट’ करणार: विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे 'परफॉर्मन्स ऑडिट' करणार: विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे 'परफॉर्मन्स ऑडिट' करणार: विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे 'परफॉर्मन्स ऑडिट' करणार: विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : श्रीगोंदा: जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था (Law and Order) आणि वाढती गुन्हेगारी पाहता, आता प्रत्येक पोलीस ठाण्याचे आणि अधिकाऱ्यांचे ‘परफॉर्मन्स ऑडिट’ करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले आहेत. कामात कुचराई करणाऱ्या आणि गुन्हेगारांना (Criminals) पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.

नक्की वाचा: मोठी बातमी!राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

अधिकाऱ्यांचे लोकेशन ट्रॅक हाेणार

रविवारी (ता.११) श्रीगोंदा येथे आयोजित आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते उपस्थित होते. शासकीय कार्यालयांत अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर उपाय म्हणून गुजरात राज्याच्या धर्तीवर ‘डॅशबोर्ड सिस्टीम’ आणि नवीन ॲप विकसित केले जाणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांचे लोकेशन ट्रॅक होईल आणि कामकाजात पारदर्शकता येईल.

अवश्य वाचा : ‘साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील

गुन्हेगारांना संरक्षण मिळणे ही गंभीर बाब (Radhakrishna Vikhe Patil)

अवैध धंदे, गुन्हेगारी आणि अमली पदार्थांची तस्करी हे मोठे आव्हान आहे. गुन्हेगारांना संरक्षण मिळणे ही गंभीर बाब असून, पोलीस अधीक्षकांनी यावर कडक कारवाई करावी, अशा सूचना दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. साकळाई पाणी योजनेतील त्रुटी दूर झाल्या असून १५ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू होईल. तसेच डिंभे ते माणिकडोह बोगद्याबाबतचे गैरसमज दूर झाल्याने या कामाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.