Kedgaon : केडगावचे सर्व प्रश्न सोडवून चांगल्या मूलभूत सोयीसुविधा देण्याची जबाबदारी माझी : आ.संग्राम जगताप

MLA Sangram Jagtap : केडगावचे सर्व प्रश्न सोडवून चांगल्या मूलभूत सोयीसुविधा देण्याची जबाबदारी माझी : आ.संग्राम जगताप

0
MLA Sangram Jagtap : केडगावचे सर्व प्रश्न सोडवून चांगल्या मूलभूत सोयीसुविधा देण्याची जबाबदारी माझी : आ.संग्राम जगताप
MLA Sangram Jagtap : केडगावचे सर्व प्रश्न सोडवून चांगल्या मूलभूत सोयीसुविधा देण्याची जबाबदारी माझी : आ.संग्राम जगताप

Kedgaon : नगर : महानगरपालिकेत केडगावचा (Kedgaon) समावेश झाला तरी या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. केडगावमध्ये चांगल्या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केडगावचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मी लक्ष घालत आहे. तसेच केडगावचा रस्त्यांचा प्रश्न बहुतांशी सोडवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने शहरासह उपनगरचा विकासाला आता गती मिळाली आहे. म्हणून येणाऱ्या काळात या विकास कामांची गती अधिक वाढवण्यासाठी विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या युतीच्याच उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवा. केडगावचे सर्व प्रश्न सोडवून चांगल्या मूलभूत सोयीसुविधा देण्याची जबाबदारी मी घेतो. ब्राम्हण समाजाने या निवडणूकीत युतीच्या मागे उभे राहण्याचा योग्य निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केले.

नक्की वाचा: मोठी बातमी!राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

केडगाव ब्राह्मण समाजाची बैठक संपन्न

केडगाव भागातील प्रभाग १६ व १७ चे राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या केडगाव मधील ब्राम्हण समजाच्या बैबैथाकीत आ.संग्राम जगताप बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केडगाव ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण जोशी होते.

अवश्य वाचा : ‘साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील

यावेळी रवी बडवे, नंदकुमार पोळ, धनंजय जामगावकर, पंकज जहागीरदार, अजिंक्य गुरावे, योगेश दानी, श्री.पठारे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपा युतीचे उमेदवार सुनीता कांबळे, वर्षा काकडे, विजय पठारे, अमोल येवले, मयूर बांगरे, मनोज कोतकर, राजेश भालेराव, मुकुल गंधे, कुलकर्णी आदींसह मोठ्या संख्येने ब्राम्हण समाजातील नागरीक उपस्थित होते.

हे देखील वाचा: सिस्पे घोटाळ्याची चौकशीची घोषणा झाली तर एवढे गडबडता का? विखेंचा लंकेंवर निशाणा

डॉ.श्रीकृष्ण जोशी म्हणाले, (Kedgaon)

केडगाव भागाचा पाणी प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाहीये. अजूनही आठवड्यातून दोन दिव वेळच मिळते. आ.संग्राम जगताप यांनी जसा केडगाव मधील रस्त्यांचा प्रश्न सोडवला तसाच येणाऱ्या काळात पाण्याच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे. तसेच केडगावमध्ये रस्त्यावर भरणारा भाजी बाजाराचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे. आ.संग्राम जगताप यांनी आता केडगावची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे आपण भाजपा राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीच्या मागे उभे राहू, असे अवाहन केले.