
Kotwali Police Station : नगर: अहिल्यानगर शहरातील पिंजार गल्ली येथे आज(ता.१३) पहाटे राजकीय वादातून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) चौघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल (Crime registered) करण्यात आला आहे. या दगडफेकीत वाहनाचे मोठे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.
नक्की वाचा: केडगावचे सर्व प्रश्न सोडवून चांगल्या मूलभूत सोयीसुविधा देण्याची जबाबदारी माझी : आ.संग्राम जगताप
संशयित आरोपींची नावे
बंटी सुनील ढापसे, करण सुनील ढापसे, पप्पू ढापसे (पूर्ण नाव माहित नाही), जितेंद्र सुनील ढापसे, सर्व (रा. शिलाविहीर सावेडी अहिल्यानगर), भूषण अर्जुन ढापसे (रा. पिंजार गल्ली महादेव मंदिराजवळ अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपीचे नाव आहे.
अवश्य वाचा : संक्रांत साजरी करता, मात्र आदला आणि नंतरचा दिवस का महत्वाचा आहे ? जाणून घ्या…
शिवीगाळ करत दगडफेक (Kotwali Police Station)
याबाबत रोनक मुथा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांचे आडते बाजार येथे दुकान असून ते दुकानाचे काम आटपून घराकडे निघाले असता त्यांना वाटेत रोशन गांधी, सुरेंद्र गांधी व ओमकार जोशी हे रस्त्यात भेटले असता गप्पा मारत होते. त्यावेळी बंटी ढपसे तेथे आला व तुम्ही येथे काय करता, असे म्हणत शिवीगाळ करत दगडफेक केली. दगडफेकीत चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


