Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन व मतदान यंत्रे सज्ज; उद्या होणार मतदान

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन व मतदान यंत्रे सज्ज; उद्या होणार मतदान

0
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन व मतदान यंत्रे सज्ज; उद्या होणार मतदान
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन व मतदान यंत्रे सज्ज; उद्या होणार मतदान

Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) उद्या (ता. १५) मतदान (Voting) प्रक्रिया होणार आहे. यासाठी आज (ता. १५) निवडणूक आयोगाकडून (Election Commission) मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले. ही मतदान प्रक्रिया उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी ३५ मतदान केंद्र (Polling station) व सात इमारती संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा राहणार आहे.

अवश्य वाचा : संक्रांत साजरी करता, मात्र आदला आणि नंतरचा दिवस का महत्वाचा आहे ? जाणून घ्या…

६३ जागांसाठी मतदान यंत्रांचे वाटप

अहिल्यानगर महापालिका व निवडणूक प्रशासनाकडून भोसले आखाडा येथील प्रभाग समिती क्रमांक ४ कार्यालयाच्या आवारात मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक प्रभागासाठी तीन मतदान यंत्रे वाटप करण्यात आली आहेत. या मतदान यंत्रांना व्हीव्हीपॅट देण्यात आलेला नाही. त्यामुळे या मतदान प्रक्रियेत कोठेही व्हीव्हीपॅट दिसणार नाही. या निवडणूक प्रक्रियेत ६८ जागांपैकी पाच जागा बिनविरोध निवडून आलेल्या असल्याने केवळ ६३ जागांसाठी मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या मतदान प्रक्रियेसाठी १८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

या निवडणुकीत ६३ जागांसाठी २७८ निवडणूक रिंगणात आहेत. पाच बिनविरोध ठरलेल्या जागांपैकी प्रभाग सहा ब मध्ये सोनाबाई शिंदे, ड मध्ये करण कराळे, प्रभाग ७ ब मध्ये पुष्पा बोरुडे असे भाजपचे तीन उमेदवार तर प्रभाग आठ ड मध्ये कुमार वाकळे व प्रभाग १४ अ मध्ये प्रकाश भागानगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत प्रभाग १७ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून ४ नगरसेवक महापालिकेत जातील. यासाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे.

नक्की वाचा: निंबळकमधील दुकानातून १५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

पोलीस प्रशासन सज्ज (Ahilyanagar Municipal Corporation Election)

या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांना १२०० अंमलदार, १५० अधिकारी, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) एक तुकडी, ६०० होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरात सात इमारतीतील ३५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एक हजार ७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. २३३ जणांवर शहर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.