Ahilyanagar to Shirdi Highway : महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक

Ahilyanagar to Shirdi Highway : महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक

0
Ahilyanagar to Shirdi Highway : महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक
Ahilyanagar to Shirdi Highway : महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक

Ahilyanagar to Shirdi Highway : राहुरी: अहिल्यानगर बायपास ते शिर्डी महामार्गाच्या (Ahilyanagar to Shirdi Highway) रखडलेल्या कामाला लागलेले ग्रहण सुटावे आणि या रस्त्याची साडेसाती कायमची दूर व्हावी, या मागणीसाठी राहुरीतील व्यापारी असोसिएशन (Rahuri Traders Association) आणि संतप्त नागरिकांनी राहुरी (Rahuri) येथील राहू केतूच्या मंदिरात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अभिषेक घातला.

याप्रसंगी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपाध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक प्रतीक तनपुरे, रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे, नवनीत दरक, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारख, नंदकुमार भट्टड, सूर्यकांत भुजाडी, सुनील देशपांडे, अनिल कासार, विलास तरवडे, स्वप्निल कासार, गणेश नेहे, संतोष आळंदे, बाळासाहेब उंडे, माधव बिडवे, प्रवीण ठोकळे, एकनाथ खेडेकर, लक्ष्मीकांत तनपुरे, संतोष लोढा, मोहन जोशी, प्रवीण दरक, अनिल भट्टड, विलास उदावंत, मच्छिंद्र गुलदगड आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : संक्रांत साजरी करता, मात्र आदला आणि नंतरचा दिवस का महत्वाचा आहे ? जाणून घ्या…

त्रस्त नागरिकांचे आता थेट ग्रहांना साकडे

प्रशासकीय अनास्था आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निषेधार्थ त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता थेट राहुरीत ग्रहांना साकडे घातले आहे. रस्त्याचे काम सुरू झाले आणि अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. धोकेदायक खड्डे बुजवले जावेत, या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ठिकठिकाणी महामार्ग खोदून एकेरी वाहतूक केली आहे. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. दररोज हजारो वाहने  तासनतास अडकून पडत आहेत. वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन कामाचा वेग वाढवावा अशी मागणी होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

नक्की वाचा: निंबळकमधील दुकानातून १५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

अरुण तनपुरे म्हणाले की, (Ahilyanagar to Shirdi Highway)

कारखान्याचे अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे म्हणाले की, प्रशासनाकडे सातत्याने मागणी करूनही अपेक्षित सुधारणा दिसत नाहीत. म्हणून व्यापारी असोसिएशन व विविध संघटना व रस्ता कृति समितीने आज अभिषेक करून खास राहू केतू ग्रहांना साकडे घातले आहे. या कामातील अडचणी दूर व्हाव्यात. लवकरात लवकर चांगला महामार्ग व्हावा, अशी मी प्रार्थना करतो.


व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी प्रकाश पारख म्हणाले की, प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळतात. प्रत्यक्ष काम संथ गतीने सुरू आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे. शहरी भागामध्ये रस्ता अरुंद केला जात आहे. रस्त्याचे काम करत असताना वाहतूक कोंडी होणार नाही याची कुठलीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक राहुरी गावातून वळत आहे. त्यामुळे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. ३० मीटर रस्ता विकसित करण्यात आला पाहिजे. प्रत्यक्षात साईड गटारी हद्द संपताना हव्या होत्या. रस्त्याच्या मध्येच त्या केल्याने रस्ता अरुंद होत आहे. शिर्डी प्रमाणे शहरी भागात सहा पदरी महामार्ग विकसित केला पाहिजे. हे ग्रहण आता सुटावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास नागरिकांच्या रास्त मागण्यांची दखल घेण्याची सद्बुद्धी मिळावी, यासाठी आम्ही राहू केतू महाराजांना अभिषेक घातला आहे.