Kumbh Mela : कुंभमेळ्यापूर्वीच शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा : विभागीय आयुक्त डॉ. गेडाम

Kumbh Mela : कुंभमेळ्यापूर्वीच शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा : विभागीय आयुक्त डॉ. गेडाम

0
Kumbh Mela : कुंभमेळ्यापूर्वीच शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा : विभागीय आयुक्त डॉ. गेडाम
Kumbh Mela : कुंभमेळ्यापूर्वीच शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा : विभागीय आयुक्त डॉ. गेडाम

Kumbh Mela : नगर : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर शिर्डीत (Shirdi) येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. शिर्डी विमानतळ विस्तारीकरण व रस्त्यांच्या कामांचा वेग वाढवून ती कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण करावीत. तसेच, गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय सोयीपेक्षा भाविकांसाठीच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी दिल्या.

नक्की वाचा: अहिल्यानगर मनपा निवडणूक : महायुतीचा ‘महाविजय’, तर दिग्गजांना पराभवाचा धक्का!

‘कोपरगाव पॅटर्न’ राबविण्यात यावा

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या (२०२६-२७) अनुषंगाने शिर्डी-शिंगणापूर येथील भाविकांच्या गर्दी नियोजनाबाबत साईबाबा मंदिर सभागृहात आयोजित आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी उपस्थित होते.गेडाम म्हणाले, शिर्डी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांचा वेग वाढविण्यात येऊन पुढील सहा महिन्यांच्या आत कामे पूर्ण करण्यात यावीत. रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी ‘कोपरगाव पॅटर्न’ राबविण्यात यावा. शिर्डी हे टर्मिनस असल्याने गाड्या वळवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना कोपरगावला थांबा देऊन तिथून बसेसद्वारे भाविकांना शिर्डीत आणण्याचे नियोजन करण्यात यावे.शिर्डी-राहाता बायपासच्या कामाचा दर्जा उत्तम राहील, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

अवश्य वाचा: अहिल्यानगरच्या प्रभाग १मध्ये राष्ट्रवादी पुन्हा; मैत्रीपूर्ण लढतीत शारदा ढवणांची सरशी

नगर-मनमाड महामार्गाचे काम वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे…(Kumbh Mela)

आपण स्वतः या कामाची व साहित्याची पाहणी करणार असून, त्रुटी आढळल्यास काम पुन्हा करण्यास सांगितले जाईल. नगर-मनमाड महामार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे.मनमाडकडून येणारी वाहने ‘येवला-वैजापूर-गंगापूर-नेवासा-अहिल्यानगर’ या मार्गाने वळवण्यात यावीत. एस. टी. महामंडळातर्फे पर्वणी काळात दररोज ६८० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी एस.टी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी यावेळी सांगितले. कुंभमेळ्यात मोबाईल नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी १४ नवीन टॉवर्स व ५ फिरते टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. तसेच, अग्निशमन सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी नाशिकच्या एकत्रित प्रस्तावात समाविष्ट करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीला महसूल, जिल्हा परिषद, साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरिषद, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शिर्डी विमानतळ, रेल्वे, एस.टी.महामंडळ व महावितरण या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.